खासगी शाळांना फीवाढीचा मुक्त परवाना !
कुठे, किती बक्षिसाची हंडी पहा वेबसाइटवर
Dahikala Website has been launchedLast Updated (Tuesday, 31 August 2010 12:31) पुनर्बांधणीचा नवा फॉर्म्युला?ठाणे शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी क्लस्टर डेव्हलपमेंटपेक्षा अभिनव फॉर्म्युला शोधण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी राज्याचे मुख्य सचिव जे. पी. डांगे यांच्या अध्यक्षतेखाली नगरविकास सचिव मनुकुमार श्रीवास्तव, टी. सी. बेंजामिन, गृहनिर्माण सचिव सीताराम कुंटे आणि ठाणे महापालिकेचे आयुक्त आर. ए. राजीव यांचा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. ही समिती येत्या तीन महिन्यांच्या आत या पुनर्बांधणीचा फॉर्म्युला ठरविणार आहे. कळव्यातील सोनीबाई भुवन ही इमारत कोसळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद आव्हाड यांनी येथील धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी 'क्लस्टर डेव्हलपमेंट' ही योजना राबविण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत ही समिती स्थापन करण्याचा निर्णय झाल्याचे जितेंद आव्हाड यांनी सांगितले. या पुनर्बांधणीसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनीही पाठपुरावा सुरू ठेवला आहे. स्कायवॉक बनलेत बेघरांचे 'घर' !पादचा-यांच्या सोयीसाठी एमएमआरडीएने बांधलेले स्कायवॉक सध्या बेघर लोकांसाठी आसरा बनले आहेत. मुंबईसारख्या शहरात स्वतःचं घर हे दिवास्वप्न आहे. बेघर लोकांसाठी आतापर्यंत फुटपाथ हा आधार होता. पण आता त्यांनी स्कायवॉकचा अनधिकृतपणे निवा-यासाठी वापर करायला सुरूवात केली आहे. स्कायवॉक बांधणी आणि देखभालासाठी जबाबदार असलेल्या एमएमआरडीएने मात्र याप्रकरणी कोणतीही उपाययोजना केलेली नाही. पादचा-यांना वाहनांच्या गर्दीतून सुटका करून देणारे स्कायवॉक रात्री मात्र अनेकांसाठी हक्काचा निवारा बनले आहेत. अंधेरी पुर्वेला असणारा स्कायवॉक रोज रात्री दोनशे ते अडीचशे लोकांसाठी घर बनतो. अंधेरीसह बांद्रा पश्चिमेला असणारा स्कायवॉक भिकारी लोकांचा अड्डा बनला आहे. तर सांताक्रुझ येथील स्कायवॉकच्या काही जागेवर फेरीवाल्यांनी ताबा मिळवला आहे. घाटकोपर येथे बांधण्यात आलेल्या स्कायवॉकचा पादचारी फारसा वापर करत नाही. यामुळे स्कायवॉकचा वापर दिवसा प्रेमी युगुलं तर रात्रीच्या वेळी काही कामगार झोपण्यासाठी करतात. यासंदर्भात पोलिसांना विचारलं असता , हे कामगार मेट्रो रेल्वे कन्स्ट्रक्शन साइटवरील आहेत असं त्यांनी सांगितलं. एमएमआरडीएने नियुक्त केलेले सुरक्षारक्षक मात्र याकडे कानाडोळा करत आहेत.
दारिद्र्यरेषेची 'व्याख्या' बदला !देशातील गरिबी वाढत असताना सरकार मात्र त्यांच्या संख्येची आकडेमोड करत बसली आहे. या वेळी दारिद्यरेषेची पुनर्मांडणी करण्याची आवश्यकता आहे. वर्षाला एक लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्व कुटुंबांचा समावेश दारिद्यरेषेखालील वर्गात करून कामगार व गरीब जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केली. ही मागणी मान्य न झाल्यास संसदेला घेराव घालून प्रखर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. ठाण्यात आयोजित भारतीय जनता कामगार महासंघाच्या दुसऱ्या अधिवेशनात गडकरी यांनी ही मागणी केली. येत्या २५ सप्टेंबरला 'कामगार राष्ट्रीय महासंघ' स्थापन करण्याची घोषणाही गडकरी यांनी या वेळी केली. देशात ४२ कोटी असंघटित कामगार असून त्यांना काँग्रेसच्या सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. मुंबई, ठाण्यामध्ये संघटित कामगारांचे अनेक लढे आतापर्यंत झाले. त्यातील काही यशस्वी झाले तर काही अजूनही चालू आहेत. पण त्यांच्या प्रश्नांविषयी सहानुभूती दाखवणे तर दूरच पण गिरण्यांच्या जागांवर मॉल आणि टॉवर यांना परवानगी देऊन कामगारांच्या जखमेवर काँग्रेस सरकार मीठ चोळत आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभारण्याची घोषणाही त्यांनी केली.
लोकमान्य टिळक आदर्श पालक ! 'स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच', या गर्जनेने महाराष्ट्रातच नव्हे तर समस्त भारताला स्वराज्याचा मूलमंत्र ज्यांनी दिला त्या नरकेसरी लोकमान्य बाळ गंगाधर टिळाकांविषयी बरेच माहीत आहे. पण त्यांच्या कुटुंबाविषयी विशेष असे ठाऊक नाही. सनातनी म्हणून हिणवल्या जाणाऱ्या पुण्यात राहूनही टिळकांनी पालकत्व कसे करावे, याचा एक आदर्शच घालून दिला होता, असे मत ज्येष्ठ लेखक व एसएनडीटीचे डॉ. अनंत देशमुख यांनी व्यक्त केले. 'कुटुंबवत्सल लोकमान्य टिळक' या व्याख्यानात बोलताना डॉ. देशमुख यांनी टिळकांच्या कुटुंबाच्या, त्यांच्या परिवाराविषयी कट्टेकऱ्यांना माहिती दिली. टिळकांना विश्वनाथ, रामभाऊ आणि श्रीधरपंत अशी तीन मुले होती. त्यातील विश्वनाथ वयाच्या २०व्या वषीर् १८९६सालच्या प्लेगच्या साथीत मृत्युमुखी पडला. पण रामभाऊ आणि श्रीधरपंत हे कर्तृत्ववान ठरले. टिळकांना मंडलेच्या तुरुंगात पाठवले असता जाण्याआधी त्यांनी घराची सर्व जबाबदारी त्यांच्या भाच्यावर म्हणजे धोंडोपंत विध्वंस यांच्यावर टाकली. तुरुंगात असतानाही पत्राद्वारे टिळकांचा आपल्या मुलांवर, त्यांच्या शिक्षणावर कटाक्ष असे. तसेच, त्यांच्या शिक्षकांशीही ते पत्रव्यवहार करीत होते. टिळकांच्या पत्नीला मधुमेह असल्याने त्यांच्या प्रकृतीविषयीची काळजीही त्यांच्या पत्रातून आपल्याला दिसते, असे डॉ. देशमुख म्हणाले. भांडवली मूल्यावर ठरणार प्रॉपर्टी टॅक्स !मुंबई शहर व उपनगरांत आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता करातील (प्रॉपटीर् टॅक्स) भेदभाव नष्ट करणारी नवी करप्रणाली १ एप्रिल २०१०पासून पूर्वलक्षी प्रभावाने अमलात आली आहे. 'रेडी रेकनर'शी सुसंगत अशा जागेच्या भांडवली मूल्यावर प्रॉपटीर् टॅक्स आकारला जाणार असून त्यामुळे शहरात हा कर वाढण्याची चिन्हे आहेत; तर उपनगरांना काहीसा दिलासा मिळेल. मुंबई पालिकेचे आयुक्त स्वाधिन क्षत्रिय यांनी शुक्रवारी या नव्या करप्रणालीची माहिती दिली. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मालमत्ता कराची बिले मूल्याधारित किंमतीनुसार पाठवली जातील. पुढची बिले मात्र मात्र भांडवली मूल्यावर आधारित करप्रणालीनुसार पाठवली जातील. दर सहा महिन्यांनी बिले पाठवली जातील. मालमत्तेच्या क्षेत्रफळाच्या आधारावर करआकारणी असेल. कर कमी वा जास्त असल्यास पुढच्या बिलात सामावून घेतला जाईल, असे आयुक्तांनी सांगितले. भांडवली मूल्यावर आधारित करप्रणाली लागू करण्याचा निर्णय पालिकेने यापूवीर्च घेतला होता. त्यास विधिमंडळाने मान्यता दिली असून राज्यपालांनीही संमती दर्शविली आहे. नवी करप्रणाली ठरवताना मालमत्तेच्या क्षेत्रफळाचा आधार घेण्यात येणार असल्याने मंुबईतील सर्वच्या सर्व मालमत्तांच्या क्षेत्रफळाची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यासाठी खासगी एजन्सीची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अनिल डिग्गीकर यांनी दिली.मुंबई शहर व उपनगरांत आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता करातील (प्रॉपटीर् टॅक्स) भेदभाव नष्ट करणारी नवी करप्रणाली १ एप्रिल २०१०पासून पूर्वलक्षी प्रभावाने अमलात आली आहे. 'रेडी रेकनर'शी सुसंगत अशा जागेच्या भांडवली मूल्यावर प्रॉपटीर् टॅक्स आकारला जाणार असून त्यामुळे शहरात हा कर वाढण्याची चिन्हे आहेत; तर उपनगरांना काहीसा दिलासा मिळेल.
वेलंकनीसाठी एकही गाडी नाही!वेलंकनी यात्रेसाठी पश्चिम रेल्वेने एकही गाडी सोडली नसल्याने यात्रेकरूंनी पश्चिम रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवून निषेध नोंदवला आहे. मध्य रेल्वेने २७ ऑगस्टला यात्रेसाठी विशेष ट्रेन सोडली पण वांरवार मागणी करूनही प. रेल्वेने दुर्लक्ष केल्याने यात्रेकरून नाराज आहेत. मध्य रेल्वेने वेलंकनी यात्रेसाठी २६ व २७ ऑगस्ट रोजी दादर ते नागापटिणम या मार्गावर जादा ट्रेन सोडली आहे. पश्चिम रेल्वेने २७ ऑगस्ट व ६ सप्टेंबर रोजी जादा गाड्या सोडण्यासाठी 'महाराष्ट्र वेलंकनी यात्रेकरू महासंघा'चे चालीर् रोझारियो यांनी पत्रव्यहार केला होता. या यात्रेसाठी वसई, विरार, पालघर तसेच पश्चिम उपनगरातून मोठया संख्येने यात्रेकरून जातात. पश्चिम रेल्वेने जादा ट्रेन सोडली असती तर यात्रेकरूंची मोठी सोय झाली असती, असे रोझारियो म्हणाले.
|




गिरगावातील दहा तरूण गोविंदाप्रेमींनी जीपीएस ग्लोबल पोझिनिंग सिस्टीम तंत्रज्ञानाचा आधार घेत कोणत्या रस्त्यावर मोठ्य़ा हंड्या बांधण्यात आल्या आहेत याची माहिती माऊसच्या एका क्लिकवर कळणार आहे. आयटी इंजिनीअर असलेला सचिन शहाणे यंच्या पुढाकाराने राजेश आंबेरकर,प्रशंात वेंगुर्लेकर,आदित्य मोरे या मित्रांनी 

