नवी मुंबई कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी
नवी मुंबई महानगरपालिकेसाठी ११ एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी करीत एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीचे नवी मुंबई महापालिकेसाठी जागावाटप निश्चित झाले आहे. याठिकाणी कॉंग्रेस २२ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस ६५ जागांवर निवडणूक लढविणार आहेत
नवी मुंबईसाठी युतीचे जागावाटप जाहीरनवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने वाशी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात एकत्रित निवडणूक लढविण्याची घोषणा केली. भाजपला १४ जागा सोडून शिवसेना ७५ जागा लढविणार आहे. एकूण ८९ जागांपैकी १४ भाजप आणि ७५ शिवसेना लढविणार असून शिवसेना-भाजप युती ६० जागा जिंकणार, ही काळ्या दगडावरची रेष असल्याचा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
दहावीची परीक्षा आजपासून सुरू विद्यार्थी जीवनातील महत्त्वाचा टप्पा असलेली दहावीची परीक्षा गुरुवारपासून सुरू होत आहे. यंदा राज्यातील १९ हजार ४८७ शाळांतून १६ लाख २६ हजार ३४२ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. यापैकी ९ लाख १ हजार ४७१ विद्यार्थी तर, ७ लाख २४ हजार ८७१ विद्याथिर्नी राज्यातील ३ हजार ६९२ केंदांवर परीक्षा देणार आहेत. माध्यमिक शालांत परीक्षेच्या अभ्यासक्रमातील गणित (बीजगणित आणि भूमिती) या विषयांच्या अभ्यासक्रमाला पर्याय म्हणून सामान्य गणित हा विषय नव्याने अभ्यासक्रमात समाविष्ट केलेला आहे. यंदा प्रथमच या विषयाची बोर्डाची परीक्षा होणार आहे! कॉपीबहाद्दरांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ७ याप्रमाणे २४५ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. अपंग विद्यार्थ्यांसाठी तसेच डिसलेक्सिया, डिसकॅलक्युलिया आणि डिसग्राफिया असलेल्या विद्यार्थ्यांसाठी लेखनिक वापरण्यासारख्या खास सवलती देण्यात येतील, असे बोर्डातफेर् स्पष्ट करण्यात आले आहे. ठाण्यात गुजंणार मराठी अभिमानमराठी माणसाने प्रत्येक मराठी सण हा जल्लोषात साजरा केला पाहिजे . २७ फेब्रुवारी हा मराठी भाषादिनी ११२ प्रस्थापित गायक, ६५ वादक कलाकार, ३५० लोकांचे समूहगान, नऊ स्टुडिओ, १२ ध्वनिमुदक, तीन शहर आणि २००० लोकांचा सकारात्मक सहभाग यातून साकारलेल्या पहिल्यावहिल्या, भारतातील सर्वात भव्य गीताचा अर्थात, 'मराठी अभिमान गीता'चा प्रकाशन सोहळा, २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषादिनी ठाण्यात रंगणार आहे.
Last Updated (Saturday, 27 February 2010 06:50) शिवसेना सराव परिक्षेत मुग्धा वर्तक प्रथम दहावीच्या विद्यार्थ्यांना उत्सुकता असणाऱ्या व त्यांचे मनोबल वाढविणाऱ्या शिवसेना एस.एस.सी सराव परिक्षेचा निकाल व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दै.महाराष्ट्र टाईम्सचे संपादक अशोक पानवलकर यांच्या हस्ते व शिवसेना जिल्हासंपर्क प्रमुख, आमदार एकनाथ शिंदे ,महापौर अशोक वैती व शहरप्रमुख रमेश वैती यांच्या उपस्थितीत पार पाडला.बबनराव एम.पडवळ विद्यालय वागळे इस्टेट ठाणे ह्या शाळेची विद्यार्थीनी कु. मुग्धा वर्तक हीने 96.67 टक्के गुण मिळवुन प्रथम क्रमांक पटकावला दुसरा क्रमांक श्रीरंग विद्यालयाच्या निलेश गावडे 92.50 टक्के तर थिराणी विद्यालयाचा निखील 92.50 बिवलकरने तिसरा क्रमांक पटकावला.
Last Updated (Saturday, 27 February 2010 06:52) रेशन दुकानावर शिवसेनेची ध़डकठाण्याच्या सावरकर नगरमधील शिधावाटप दुकानातील धान्यांची परस्पर काळ्या बाजारात विक्री तसेच शिधापत्रिवधारकांना किमतीपेक्षा जास्त भावात धान्य मिळत असल्याच्या तक्रारींची दखल घेत शनिवारी ठाणे शहर जिल्हाप्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी या दुकानावर धडक दिली.
Last Updated (Saturday, 27 February 2010 06:54) मधुकर सरपोतदार यांचे निधनशिवसेनेचे माजी खासदार मधुकर सरपोतदार (वय ७५) यांचे शनिवारी हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराने निधन झाले. सरपोतदार यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे बुधवारी (ता. १७) हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेंव्हापासून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
खेळाडू घडवणारी संस्थाविद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत शारीरिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांनी रोज व्यायाम आणि खेळ खेळण्याची गरज असते
Last Updated (Saturday, 20 February 2010 15:43) ठाणे जिल्हा पत्रकार भवन ताब्यात घेण्याचे आदेशगांवदेवी मैदानाजवळील ठाणे जिल्हा पत्रकार भवनाची वास्तू ताब्यात घेण्यासंबंधी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आबासाहेब जऱ्हाड यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिले आहेत. १९ वर्षांपासून ठाणे जिल्हा पत्रकार भवनाची वास्तू पत्रकारांच्या ताब्यात न देता विकासक राजन शर्मा यांनी ती विक्री करण्यास सुरुवात केली आहे. पत्रकारांना देण्यात येणारी तीन हजार चौ. फुटाची जागा देखील ५० लाख रुपयांमध्ये विकण्याचा घाट घालण्यात आला आहे.
|





विद्यार्थी जीवनातील महत्त्वाचा टप्पा असलेली दहावीची परीक्षा गुरुवारपासून सुरू होत आहे. यंदा राज्यातील १९ हजार ४८७ शाळांतून १६ लाख २६ हजार ३४२ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. यापैकी ९ लाख १ हजार ४७१ विद्यार्थी तर, ७ लाख २४ हजार ८७१ विद्याथिर्नी राज्यातील ३ हजार ६९२ केंदांवर परीक्षा देणार आहेत. माध्यमिक शालांत परीक्षेच्या अभ्यासक्रमातील गणित (बीजगणित आणि भूमिती) या विषयांच्या अभ्यासक्रमाला पर्याय म्हणून सामान्य गणित हा विषय नव्याने अभ्यासक्रमात समाविष्ट केलेला आहे. यंदा प्रथमच या विषयाची बोर्डाची परीक्षा होणार आहे!
दहावीच्या विद्यार्थ्यांना उत्सुकता असणाऱ्या व त्यांचे मनोबल वाढविणाऱ्या शिवसेना एस.एस.सी सराव परिक्षेचा निकाल व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दै.महाराष्ट्र टाईम्सचे संपादक अशोक पानवलकर यांच्या हस्ते व शिवसेना जिल्हासंपर्क प्रमुख, आमदार एकनाथ शिंदे ,महापौर अशोक वैती व शहरप्रमुख रमेश वैती यांच्या उपस्थितीत पार पाडला.बबनराव एम.पडवळ विद्यालय वागळे इस्टेट ठाणे ह्या शाळेची विद्यार्थीनी कु. मुग्धा वर्तक हीने 96.67 टक्के गुण मिळवुन प्रथम क्रमांक पटकावला दुसरा क्रमांक श्रीरंग विद्यालयाच्या निलेश गावडे 92.50 टक्के तर थिराणी विद्यालयाचा निखील 92.50 बिवलकरने तिसरा क्रमांक पटकावला.
