प्रसार माध्यमातिल प्रसिद्धिसाठी आमच्याशी संपर्क साधा | बातम्या | लेख | विडियो शूटिंग | जाहिराती | एसएम्एस मार्केटिंग | ईमेल मार्केटिंग | प्रेस कॉन्फरन्स | स्क्रीन प्रोजेक्टर | टीवी लाइव टेलेकास्ट | भाषा परिवर्तन (Translation) | ==>> संतोष धुरी ९२२४ ५२४८ ९२ | एम् विकास ==>>९३२३ ८२६३ ४७ - टीमसी शाळ| , नगर वाचन मंदिराजवळ, तेम्भी नाका, ठाणे (प) ईमेल - dhuriexpress@gmail.com

Dahikala Website Dahikala.com marathi websites,Marathi kavita,marathi song,marathi books,marathiworld,mymarathi,marathi font,learn marathi
Join Social Network

DhuriExpress Marathi Website SMS Service | Send SMS

Office Furniture : Office Furniture: buy used office cubicles & discount office furniture from Arnolds Office Furniture offers 1, 00,000 sqft facilities in Philadelphia. Send your enquiry now! ------------- Homes For Sale : Homes For Sale, Foreclosures listings from homesbylender.com register free. If you are selling your home visit homesbylender and list it your home for free.

Online Marathi Website

Best Marathi Movies
Photo Gallary
Download Free Marathi News Photo Maharashtra News Agency
Download Free Marathi News Photo Maharashtra News Agency
  • भारिप बहुजन महासंघ
    भारिप बहुजन महासंघाच्यावतीने ठाणेजिल्हाअधिकारी कार्यालयावर विविध मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला.
  • भारिप बहुजन महासंघाच्यावतीने...
    भारिप बहुजन महासंघाच्यावतीने ठाणेजिल्हाअधिकारी कार्यालयावर विविध मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. त्यावेळीची छायाचित्रे.मोर्चाला संबोधताना भारिप युवा नेते विजय घाटे आदि दिसत आहेत.
  • sunil-khambe-b-day
    कर्मवीर सुनिल खांबे यांना वाढदिवसानिमित्त धुरी एवसप्रेस परिवारातर्फे शुभेच्छा देताना संचालक संतोष धुरी आणि विकास मिराशी .
  • ProNarayan_Deshmukh
    पर्यावरणाची जनजागृती करणारे वृक्षमित्र प्रा.नारायण देशमुख यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्य शहापूर आदिवासी परिसरातील जिल्हा परिषदेच्या 40 शाळांमध्ये मोफत वहया वाटप केले.
  • tmc
    ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने माजिवडा-मानपाडा प्रभाग समितींतर्गत घोडबंदर रोडवरील विजयनगरी कॉम्प्लेक्स समोर बांधलेले 14 व्यावसायिक गाळे जे.सी.बी.च्या सहाय्याने जमिनदोस्त करण्यात आले. उपायुक्त बी.जी.पवार, परिमंडळ 3 चे उपआयुक्त हरिश्चंद्र मोरे, सहायक आयुक्त घनश्याम थोरात, प्रभाग अधिकारी अशोक बुरपुल्ले यांनी आयुक्त आर.ए.राजीव यांच्या आदेशान्वये ही कारवाई केली.
Dahikala Website Dahikala.com marathi websites,Marathi kavita,marathi song,marathi books,marathiworld,mymarathi,marathi font,learn marathi
Join Social Network

DhuriExpress Marathi Website SMS Service | Send SMS

Office Furniture : Office Furniture: buy used office cubicles & discount office furniture from Arnolds Office Furniture offers 1, 00,000 sqft facilities in Philadelphia. Send your enquiry now! ------------- Homes For Sale : Homes For Sale, Foreclosures listings from homesbylender.com register free. If you are selling your home visit homesbylender and list it your home for free.

Online Marathi Website

Best Marathi Movies

अकरावी प्रवेशाचा गोंधळ सुरूच !

अकरावी प्रवेशाच्या सुरळीत चाललेल्या प्रक्रियेत 'एमकेसीएल'ने नेहमीप्रमाणे गोंधळ घातला असून गुरुवारी मुदतीपूवीर्च झालेली दुसरी जनरल यादी संध्याकाळी रद्द करून शुक्रवारी सकाळी नवीन यादी जाहीर करण्याचे ठरवल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात शिक्षण खात्याने नेहमीप्रमाणेच गोंधळात भर टाकण्याची भूमिका घेतली आहे. जनरल अभ्यासशाखांच्या प्रवेशाची दुसरी यादी गुरुवारी पाच वाजता एमकेसीएलच्या वेबसाईटवर जाहीर होणार होती. पाचऐवजी ही यादी दु. १२.३०च्या सुमारास जाहीर झाली. त्यानंतर अचानक चक्रे फिरली आणि या यादीत तांत्रिक घोळ असल्याचे कारण देत ती रद्द करीत असल्याची सूचना त्यांच्या वेबसाइटवर झळकली. त्यामुळे हैराण झालेल्या विद्याथीर् आणि पालकांनी कॉलेज आणि शिक्षण विभागाशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. मात्र, 'पतेती'मुळे कॉलेज आणि शिक्षण संचालकांचे कार्यालय बंद असल्याने त्यांना तेथून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यादी रद्द झाल्याचे कारण सांगता येणार नसल्याचे म्हणत संभ्रम आणखी वाढवला.
 

सरकारही कलावंतांच्या पाठीशी !

मुंबईसह प्रमुख शहरांच्या मल्टिप्लेक्समध्ये प्राइम टाइममध्ये मराठी चित्रपटांचे शो प्राधान्याने दाखविले जाण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना केली जाईल. इतकेच नव्हे तर मराठी संस्कृती आणि मायबोली मराठीच्या संरक्षणासाठी राज्य सरकार आवश्यक ती सर्व उपाययोजना करील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येथे दिली. मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलावंत आणि तंत्रज्ञांचा समावेश असलेल्या एका शिष्टमंडळाने भुजबळ यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी वरील शब्दांत आश्वासन दिले. मराठी चित्रपटांचे शो दाखविण्याची अट संबंधितांना पाळावीच लागेल. त्यासाठी कायद्यातील तरतुदीनुसार मार्ग काढला जाईल, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले. लोकशाहीत प्रत्येकाला आपल्या मागण्यांसाठी आंदोलने करण्याचा अधिकार आहे. मात्र त्यासाठी कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार देण्यात आलेला नाही. विरोधकांनी जरूर आंदोलने करावीत. पण अखेरीस सरकार निर्णय घेणार, असेही त्यांनी स्पष्ट केले. मल्टिप्लेक्स थिएटरचालक मराठी चित्रपट निर्मात्यांची गळचेपी करतात. त्यांच्या थिएटरचे भाडे परवडत नाही. ती मंडळी बिगर मराठी चित्रपटांचे शो दाखवण्यास प्राधान्य देतात. रसिकांच्या गैरसोयीच्या वेळेस मराठी चित्रपट शो प्रदशिर्त केले जातात, अशा अडचणींचा पाढा शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री भुजबळ यांच्यासमोर वाचला.

 

'पाणीबाणी' संपली, विहार 'ओव्हर फ्लो'

‘ पाणीबाणी ’ चा सामना करणा-या मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे... वरुणराजाच्या कृपादृष्टीमुळे आज सकाळी सहा वाजल्यापासून विहार तलाव दुथडी भरून वाहू लागलाय... मोडकसागर, तानसा आणि तुळशीपाठोपाठ विहारही ‘ ओव्हर फ्लो ’ झाल्यानं मुंबईवरचं पाणीकपातीचं संकट बाप्पाच्या आगमनापर्यंत दूर होण्याची चिन्हं आहेत. मुंबई, ठाण्यात मंगळवारी संध्याकाळपासून दाखल झालेला पाऊस अजूनही थांबायला तयार नाही. अधेमधे काही मिनिटांची विश्रांती घेत पावसाच्या सरींवर सरी सुरूच आहेत. या संततधारेमुळेच विहार तलावानं आज ८०.१८ मीटर भरून पूर्ण क्षमतेनं वाहू लागला. मुंबई शहाराला पाणीपुरवठा करणारा तो छोटा, पण महत्त्वाचा तलाव. भांडुप, विक्रोळीला वर्षभर पाणी पुरवण्याची जबाबदारी विहार तलावाची आहे. तो ‘ फुल्ल ’ झाल्यानं भांडुप, विक्रोळीकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. विहार तलावाप्रमाणेच मोडकसागर (१६३.१५ मीटर), तानसा (१२८.५७ मीटर) आणि तुळशी तलाव (१३९.३६ मीटर) पूर्ण क्षमतेनं वाहत आहेत. अप्पर वैतरणाची पातळी आज ६००.७४ मीटरपर्यंत येऊन पोहोचली आहे. तो आणखी तीन मीटर भरणं बाकी आहे. भातसा धरणामध्येही अजून काही मीटर पाणीसाठा होऊ शकतो.

 

अजब 'निक्काल'..१७९ विद्यार्थी नापास !

मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागातून अर्थशास्त्रात एम. ए. करणारे १७९ विद्यार्थी नापास झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यातील चमत्कारिक बाब म्हणजे , या सर्व विद्यार्थ्यांचे आसन क्रमांक सलग एकामागोमाग एक होते आणि त्यापैकी अनेकांनी कॉलेजमध्ये ‘ टॉप ’ केले होते. त्यामुळे या विचित्र निकालामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होतंय. मुंबई विद्यापीठाचे नवनवे प्रताप , पराक्रम , चमत्कार अधेमधे समोर येत असतात. सध्या निकालांना होणा-या विलंबामुळे विद्यापीठ चर्चेत आहेच , पण त्याचबरोबर डिस्टन्स लर्निंगच्या एम ए पार्ट १ (इकॉनॉमिक्स)च्या निकालामुळे तर पुन्हा एकदा त्यांच्या भोंगळ कारभाराची प्रचिती आली आहे. या परीक्षेला , ५१९६ ते ५३७४ या आसन क्रमांकांवर बसलेले सर्वच्या सर्व १७९ विद्यार्थी नापास झाल्याचा ‘ निक्काल ’ विद्यापीठानं लावला आहे. त्यापैकी बहुतांश विद्यार्थी ‘ मॅक्रो इकॉनॉमिक्स ’ मध्ये अनुत्तीर्ण झालेत. पण सलग एकामागोमाग एक बसलेले १७९ विद्यार्थी नापास कसे होऊ शकतील , असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
 

अजब 'निक्काल'..१७९ विद्यार्थी नापास !

मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागातून अर्थशास्त्रात एम. ए. करणारे १७९ विद्यार्थी नापास झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यातील चमत्कारिक बाब म्हणजे , या सर्व विद्यार्थ्यांचे आसन क्रमांक सलग एकामागोमाग एक होते आणि त्यापैकी अनेकांनी कॉलेजमध्ये ‘ टॉप ’ केले होते. त्यामुळे या विचित्र निकालामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होतंय. मुंबई विद्यापीठाचे नवनवे प्रताप , पराक्रम , चमत्कार अधेमधे समोर येत असतात. सध्या निकालांना होणा-या विलंबामुळे विद्यापीठ चर्चेत आहेच , पण त्याचबरोबर डिस्टन्स लर्निंगच्या एम ए पार्ट १ (इकॉनॉमिक्स)च्या निकालामुळे तर पुन्हा एकदा त्यांच्या भोंगळ कारभाराची प्रचिती आली आहे. या परीक्षेला , ५१९६ ते ५३७४ या आसन क्रमांकांवर बसलेले सर्वच्या सर्व १७९ विद्यार्थी नापास झाल्याचा ‘ निक्काल ’ विद्यापीठानं लावला आहे. त्यापैकी बहुतांश विद्यार्थी ‘ मॅक्रो इकॉनॉमिक्स ’ मध्ये अनुत्तीर्ण झालेत. पण सलग एकामागोमाग एक बसलेले १७९ विद्यार्थी नापास कसे होऊ शकतील , असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
 

९०० इमारती धोकादायक !

कळव्यातील सोनीबाई भुवन ही धोकादायक इमारत कोसळून दहा जणांना जीव गमवावा लागल्यानंतर ठाणे महापालिका हद्दीतील सुमारे ९०० धोकादायक इमारतीत राहणाऱ्या सुमारे ५० हजार कुटुंबांची जीव टांगणीला लागलेला आहे. या इमारतीतल्या रहिवाशांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे अशी नोटीस पालिकेने सालाबादप्रमाणे या पावसाळ्यापूवीर् बजावलेली आहे. मात्र, नवे घर घेण्याची आथिर्क कुवत नसल्याने ही कुंटंबे त्याच घरांमध्ये जीव मुठीत धरून रहात आहेत. ठाणे शहरात सर्वाधिक धोकादायक इमारती (३३२) वागळे इस्टेट भागात आहेत. नौपाडा (१५९), मुंब्रा (१२४), माजीवाडा (९२) उथळसर (९१), कळवा (३६), वर्तकनगर (३१), कोपरी (२३) आणि रायलादेवी (८) आशी शहरातील धोकादायक इमारतींची प्रभागनिहाय आकडेवारी आहे. या धोकादायक इमारतीत राहणारी जवळपास सर्वच कुटुंबे मध्यमवगिर्य असल्याने अन्यत्र निवारा शोधण्याची आथिर्क कुवत त्यांच्यात नाही.
 

मासेमारीसाठी गेलेली बोट बुडाली !

समुदात मासेमारीसाठी गेलेली डहाणुतील चिनगारी ही बोट बुधवारी सकाळी समुदात वादळ निर्माण झाल्याने बुडाली. या बोटीवरील दहापैकी नऊ मच्छिमारांना मासेमारी करणाऱ्या दुसऱ्या बोटीने वाचवले. बुडालेल्या बोटीवरील एकमच्छिमार बेपत्ता असून कोस्टगार्ड व नौदलाकडून हेलिकॉप्टर व पाणबुड्यांच्या सहाययाने शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. धाकटी डहाणु येथील चंदकांत महादेव विंदे यांची चिनगारी यूएमआर बोट दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दहा खलाश्यांसह समुदात गेली होती. तीन तासांच्या प्रवासानंतर या बोटीने मासेमारीसाठी जाळे टाकून तेथे मोठ्या प्रमाणात घोळ मासे पकडले होते. बुडालेली चिनगारी ही बोट ज्या भागात मासेमारी करीत होती; त्या भागात डहाणु तालुक्यातील अन्य बोटीही मासेमारी करत होत्या. मात्र समुदात अचानक पाऊस, वादळ निर्माण झाल्याने पाण्यात भोवरा तयार झाला व त्यातून मच्छिमारांनी बोट बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो निष्फळ ठरला. बोट पाण्यात बुडाली.
 

कायदा मोडणा-यांना मोडतो-राज

टॅक्सी-रिक्षावाले भाडे नाकारून कायदा मोडतात. आम्ही कायदा मोडत नाही. आम्ही कायदा मोडणा-यांना मोडतो. त्यामुळे रिक्षा टॅक्सीवाल्यांनी शिस्तीत कायदा पाळायला शिका, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी दिला. मुंबईसह महाराष्ट्रातल्या प्रमुख मोठ्या शहरातील टॅक्सी-रिक्षाचालकांच्या अरेरावीच्या विरोधात मनसचे अध्यक्ष राज ठाकरे व आमदार बाळा नांदगावकर यांनी वाहतूक शाखेचे सहपोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली. मुंबईतील खड्डे, कायदा मोडण्याची प्रवृत्ती, वाहतुकीतील बेशिस्तपणा अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मुंबईत भाडे नाकारण्याचे प्रकार सर्रास घडतात. पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे टॅक्सी-रिक्षा स्टँडवर वाहतूक शाखेच्या संबंधित अधिकाऱ्याचे नाव व मोबाइल क्रमांकांचे फलक लावावेत. त्यामुळ भाडे नाकारले तर प्रवासी थेट संबंधित अधिकाऱ्याला फोन करून तक्रार करतील. फणसकर यांनी ही सूचना मान्य केल्याचे राज म्हणाले.
 

मोबाइल टॉवरचे नवे नियम !

शाळा आणि हॉस्पिटल्सच्या आवारात मोबाइल टॉवर्स उभारण्यास पूर्ण बंदी घालण्याची सूचना सरकारी समितीने केली आहे. मोबाइल टॉवर्समुळे, किरणोत्सर्जन होऊन आरोग्यावर परिणाम होतो अशा तक्रारी झाल्यामुळे सरकारने या मामल्याबाबत शिफारशी करण्यासाठी समिती नेमली होती. या समितीने म्हटले आहे की, शाळा अथवा हॉस्पिटल्सपासून तीन मीटर्स अंतरावर असे मीटर्स उभारले जाऊ नयेत. त्यांच्या शेजारच्या इमारतींवर टॉवर्स उभारण्यात आले तर त्यांचे टोक शाळा अथवा हॉस्पिटल्सच्या दिशेने असता कामा नये.
 

Join Best Friends Network

Nice Social Bookmark
Facebook MySpace Twitter Digg Delicious Stumbleupon Google Bookmarks RSS Feed 
ताज्या बातम्या
Live Money Machine