संतुलित ग्राम योजना प्रभावी राबवणार !
तामपानवाढीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात घोषित केलेेली पर्यावरण संतुलित ग्राम योजना सातारा जिल्ह्यात प्रभावीपणे राबवली जाणार असल्याची घोषणा पालकमंत्री रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केली. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गावाच्या लोकसंख्येइतकी झाडे लावून त्या तुलनेत किमान चार लाख तर कमाल १२ लाखांपर्यंत प्रोत्साहनपर निधी विकासकामांसाठी दिला जाणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक गावांनी हा निधी मिळवावा असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले. तापमानवाढीसाठी जिल्ह्यात यंदा २८ लाख झाडे लावण्याचा संकल्प त्यांनी केला. 'एक व्यक्ती, एक झाड' या उपक्रमातून झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी ग्रामस्थांनी स्वीकारावी असे आवाहनही त्यांनी केले.
Write comment (18 Comments)
इअरफोन घेतोय प्रवाशांचे बळी !कानात इअरफोन घालून मोबाइलवर गाणी ऐकत प्रवास करण्याची तरुणांची सवय अतिशय घातक सिद्घ होत आहे. दिवा ते डोंबिवली दरम्यान लोकलची धडक बसून ठार होणाऱ्या तरुणांच्या मृत्यूमागे अनेकांची ही सवय कारणीभूत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. कोपरसह दिवा व डोंबिवली या ३ रेल्वे स्टेशनांदरम्यान ८ महिन्यातच १०० जणांचे बळी गेल्याची धक्कादायक आकडेवारी उघड झाली आहे. फूट ओव्हर ब्रीजचा अभाव, लोकलच्या वेगाचा अंदाज न आल्याने बसलेली धडक, लोकलमध्ये लटकताना बाहेर पडून अपघाती मृत्यू अशा प्रमुख कारणांमुळे हे बळी गेले आहेत. मात्र या कारणांसह आणखी एक धक्कादायक कारण अपघातांमागे उघड झाले. तरुण मुलांना मोबाइलवर गाणी ऐकत रेल्वेरुळ ओलांडण्याची सवय असते. मात्र त्यामुळे वेगाने आपल्या दिशेने येणाऱ्या लोकलचा धडधडाटच त्यांना ऐकू येत नाही व त्यांचा हकनाक बळी जात असल्याचे निरीक्षण एका स्टेशन मॅनेजरने नोंदवले.
बिर्ल्ण्सनी मुंबई बिघडवली !नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिीनियरिंग रिसर्च इन्स्टीट्यूट आणि केंदीय पर्यावरण नियंत्रण मंडळाने मुंबईतल्या प्रदूषणाला कोणते घटक कारणीभूत आहेत याची पाहणी केली.
यामध्ये, मुबईत सध्या ज्या वेगाने तुफान बांधकामे सुरू आहेत त्यामुळे हवेत सतत धुळ उडते आणि बांधकामासाठी वापरलेल्या वस्तूंचे सुक्ष्म कणही हवेत तरंगत असतात. यामुळे श्वासोश्वासाला त्रास होतो. श्वास घेण्याच्या यंत्रणेवर ताण पडतो. फुफ्फुसांवर याचा परिणाम होतो अशा अनेक बाबी संबंधित डॉक्टरांनी मुंबईकरांच्या लक्षात आणून दिल्या आहेत. या खेरीज रस्त्यांची सतत कामे सुरू असतात त्याचाही परिणाम मुंबईकरांच्रा आरोग्यावर होतो असे या अहवालात म्हटले आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईत भूकंप !आज (मंगळवार) पहाटे एक वाजून सात मिनिटांनी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईला २.६ रिश्टर क्षमतेच्या भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू ठाण्यामध्ये होता. या भूकंपामुळे जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप हाती आलेले नाही.
दहावी, बारावीच्या ऑक्टोबर परीक्षा !महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाने दहावी आणि बारावीच्या ऑक्ट
कामगारांचे पगारही आता थेट बँकेतून !राज्यातील संघटित व असंघटित क्षेत्रातील दरमहा तीन हजारांपेक्षा अधिक पगार असणाऱ्या सुमारे दोन कोटी कामगारांचे वेतन, घरभाडे भत्ता आणि अन्य वेतनविषयक लाभ थेट बँकिग सिस्टीमच्या माध्यमातून मिळणार आहेत. त्यासाठी कामगार खात्याने सुरू केलेल्या 'प्रथम कामगार व्यवस्थापन प्रणाली'चे उद्घाटन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते रविवारी स्वातंत्र्यदिनी झाले. योजनेच्या पहिल्या टप्प्यात ठाणे जिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट राबवण्यात येणार असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व शहरे व नगरांमध्ये ही प्रणाली कार्यन्वित केली जाणार आहे. यामुळे कामगारांच्या आथिर्क देण्यांच्या पद्धतीत पारदर्शकता येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
फीवाढीविरोधात पालकांचे आंदोलन !कल्याणमधील आर्य गुरूकुल शाळेने सहा महिन्यांत तब्बल ७७ टक्के फीवाढ केल्याने संतापलेल्या पालकांनी शनिवारी सकाळी शाळेविरोधात आंदोलन केले. फीवाढ मागे घेण्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. आमदार गणपत गायकवाड यांनी मध्यस्थी करत पालकांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. कल्याणपूवेर्तील गुरूकुल शाळेने वर्षाच्या सुरुवातीलाच ३५ टक्के फीवाढ केली होती. त्यावेळी पालकांनीही निमूटपणे ही फीवाढ मान्य केली. शाळेने पुन्हा ४२ टक्के फीवाढ केली. नवीन फीवाढीनुसार पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना २२ हजार, पाचवी ते सातवीपर्यंत २४ हजार आणि आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना २५ हजार फी भरावी लागणार होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात फीवाढ झाल्याने पालकांचा संयम सुटला. शनिवारी सकाळी ९ वाजता शाळेच्या सुमारे ८०० पालकांनी शाळेत घुसून शाळेविरोधात जोरदार निदर्शने केेली. तब्बल चार तास हे आंदोलन सुरू होते. आंदोलन अधिक चिघळू नये, यासाठी स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनी तातडीने शाळेत धाव घेत मध्यस्थी केली. २० ऑगस्ट रोजी पालक आणि शाळा व्यवस्थापनाची संयुक्त बैठक बोलावून त्यात फीवाढीबाबत चर्चा करण्याचे आणि सर्वमान्य तोडगा काढण्याचा निर्णय यावेळी झाला.
मराठी सिनेमासाठी कायदाच हवा !मल्टिप्लेक्समध्ये प्राइम टाइममध्ये मराठी सिनेमाचे १२२ शो करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कायदा करावा, अशी मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. शनिवारी दिलेल्या दणक्यानंतरही मल्टिप्लेक्स मालक मराठी सिनेमाला दुय्यम दर्जाची वागणूक देणार असतील तर त्यांना पुन्हा दणके देऊ, असा इशारा राज यांनी दिला.
आज (सोमवारी) बोलावलेल्या मराठी सिनेनिर्मात्यांच्या बैठकीत बोलताना राज ठाकरे यांनी सरकारने केलेली तांत्रिक चलाखी उघडकीस आणली. राज्य सरकारने मल्टिप्लेक्समध्ये मराठी सिनेमाचे १२२ शो दाखवावेत असा जीआर काढला पण कायदा केलेला नाही. जीआरला कोर्टात आव्हान देता येते मात्र कायद्याला आव्हान देता येत नाही ; असे राज ठाकरेंनी सांगितले. मल्टिप्लेक्स मालकांनी जीआर असल्यामुळे कोर्टात जाऊन मराठी सिनेमांच्या शोची संख्या १२२ वरुन ४४ वर आणल्याचे राज यांनी स्पष्ट केले. मराठी सिनेमा कात टाकतोय. अशा वेळी मल्टिप्लेक्समध्ये १२२ शो प्राइम टाइममध्ये झाल्यास मराठी सिनेमाला उर्जितावस्था येईल, असा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला. त्यांनी प्रत्येक मराठी कुटुंबाला पत्र पाठवून मराठी नाटक-सिनेमा पाहण्याचे आवाहन करणार असल्याची घोषणा केली. कामगार कवी नारायण सुर्वे यांचे निधन ! गिरणगावातल्या कामगाराच्या वेदनेला शब्दांची धार देणारे ज्येष्ठ कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचे आज ठाणे येथील हेल्थ केअर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. गेले काही दिवस ते श्वसनविकार आणि दम्याच्या त्रासाने आजारी होते. सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव प्रभादेवीतील लोकवाङ्मय गृह येथे अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात येणार आहे. तर संध्याकाळी दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कण्यात येतील. लालबाग-परळमधील गिरणीकामगाराची वेदना सोबत घेऊन जन्मलेल्या सुर्वे यांनी आयुष्याची विविध रंग अनुभवले. रस्त्यावरल्या जगण्याचे चटके सोसताना त्यांनी कामगार चळवळीची दाहकताही अनुभवली. गिरणगावातील डाव्या चळवळीत त्यांनी समाजकारणाचे धडे घेतले. आपले ते रस्त्यावरचे आयुष्य हे ' माझे विद्यापीठ ' च आहे असे त्यांनी मानले आणि ते शब्दातही मांडले. कामगार आहे मी तळपती तलवार आहे .सारस्वतांनो! थोडासा गुन्हा करणार आहे नारायण सुर्वे यांचा पहिला काव्यसंग्रह ' ऐसा गा मी ब्रह्म! ' १९६२ मध्ये प्रकाशित झालं. त्या सुमारास ते मौज , सत्यकथा , मराठा , मांडवी , वीणा , युगांतर , भारूढ अशा काही नियतकालिकांतून कविता लिहित होते. त्यानंतरच्या चार वर्षांनी त्यांचा दुसरा काव्यसंग्रह आला. ' माझें विद्यापीठ ' कामगार जीवनाशी असलेल्या थेट संबंध असल्यामुळे कवी मनाचे नारायण सुर्वे यांनी त्यांनी शाळेत शिक्षक म्हणून शिकवत असतानाच कामगार चळवळीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. १९७० च्या दशकात भारत , तत्कालीन सोवियत रशिया आणि पूर्वेकडील देशांमध्ये सक्रीय कामगार नेते म्हणून त्यांची नवी ओळख निर्माण झाली. मुंबईतील कामगार संघटनेत काम करताना त्यांनी कामगारांच्या हक्कांसाठी तीव्र संघर्ष केला. पण या काळातही कवितेशी असणारी मैत्री काही तोडली नाही. |




गिरणगावातल्या कामगाराच्या वेदनेला शब्दांची धार देणारे ज्येष्ठ कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचे आज ठाणे येथील हेल्थ केअर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. गेले काही दिवस ते श्वसनविकार आणि दम्याच्या त्रासाने आजारी होते. सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव प्रभादेवीतील लोकवाङ्मय गृह येथे अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात येणार आहे. तर संध्याकाळी दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कण्यात येतील. लालबाग-परळमधील गिरणीकामगाराची वेदना सोबत घेऊन जन्मलेल्या सुर्वे यांनी आयुष्याची विविध रंग अनुभवले. रस्त्यावरल्या जगण्याचे चटके सोसताना त्यांनी कामगार चळवळीची दाहकताही अनुभवली. गिरणगावातील डाव्या चळवळीत त्यांनी समाजकारणाचे धडे घेतले. आपले ते रस्त्यावरचे आयुष्य हे ' माझे विद्यापीठ ' च आहे असे त्यांनी मानले आणि ते शब्दातही मांडले. 