सन्मित्रकार स.पां. जोशी यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमीत्त सन्मित्रकार स.पा.ं जोशी स्मृती पुरस्कार प्
सन्मित्रकार स.पां. जोशी यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमीत्त सन्मित्रकार स.पा.ं जोशी स्मृती पुरस्कार प्रदान समारंभ ठाणे म.पा. शाळा क्र. 1 मधील सन्मित्रकार कै. स. पां. जोशी रंगमंच येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ इतिहासतज्ञ वि. ह. भूमकर सर यांच्या हस्ते पत्रकार शरद सोनार, मुद्रण शिक्षक किरण प्रयागी, कवयित्री डा1. अनुपमा उजगरे, नाटककार डॉ. र.म. शेजवलकर, साहित्य रसिक श्री.ल. टिळक, समाजसेवक प्रा.रमेश पानसे, मराठी भाषा प्रचारक कौशल इनामदार यांना या वर्षीचे सन्मित्रकार स.पा. जोशी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे ठाण्याचे महापौर अशोक बारकू वैती व उपमहापौर मनोज लासे उपस्थित होते त्यावेळचे छायाचित्र
पावसाची गैरहजेरी मुंबईकरांसाठी महत्त्वाची मलेरिया आणि इतर आजारांवर आळा बसण्यासाठी पावसाची गैरहजेरी मुंबईकरांसाठी महत्त्वाची झाली आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पाऊस ओसरल्यास 10 दिवसांत मुंबई मलेरियामुक्त होईल. पालिका रुग्णालयातील मलेरिया आणि स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या घटल्याचे केईएम रुग्णालयाच्या संसर्गजन्य रोग विभागाच्या प्रमुख डॉ. दक्षा शहा यांनी माहिती दिली. पाऊस कमी झाल्याने मलेरिया आणि इतर आजारांच्या रुग्णांची संख्या कमी झाल्याचे त्यांनी कबूल केले. यामुळे ऍडमिट होणार्या रुग्णांच्या संख्येतही घट झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लोकांमध्येही जागृती झाल्याने रुग्ण तत्काळ रुग्णालयामध्ये येऊ लागल्यानेही हे प्रमाण कमी झाल्याचे डॉ. शहा म्हणाल्या. डॉ. दक्षा शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस पाऊस न पडल्यास 10 दिवसांत मलेरियावर पूर्ण नियंत्रण मिळविता येईल. Last Updated (Monday, 09 August 2010 11:09) 750 एकरांत डंपिंग ग्राउंड-ई कचर्याचेही व्यवस्थापन ई कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठीही खासगी आणि सरकारी सहभागातून प्रकल्प उभारला जाणार आहे. संगणक, मोबाईल फोन, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांचा कचर्यात समावेश होतो. मुंबईत दरवर्षी 11 हजार टन तर राज्यात किमान 20 हजार टन ई कचरा तयार होतो.एसएनडीटीतील होम सायन्स बंद !एसएनडीटी विद्यापीठातील होम सायन्स हा अभ्यासक्रम पुढलया वषीर्पासून बंद करण्यात येणार आ
महाराष्ट्रातील प्रमुख नद्या दुषित !महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नद्यांचे पाणी प्रदुषित आहे. यामध्ये मुंबईतील मिठी, ठाण्यातील काळू आणि भातसा आणि पुण्यातील मुळा आणि मुठा यांचा समावेश आहे. ही माहिती केद सरकारच्या मध्यवर्ती प्रदुषण नियंत्रण मंडळाने ही यादी केली आहे. या सर्व नद्यांची तपशीलवार पाहणी मंडळाच्या संशोधकांनी केली. या नद्यांमध्ये भीमा, गोदावरी, पवना, पंचगंगा, पाताळगंगा, इंदायणी, कोयना, कुंडलिका, तापी, गिरणा, वैनगंगा, नीरा, वर्धा, कृष्णा, पूर्णा, चंदभागा, वेण्णा, रंगावली, भातसा या नद्यांचा समावेश आहे. या नद्या प्रदुषित होण्यात प्रामुख्याने कारखाने आणि साखर कारखाने यांचा मोठा वाटा आहे. ते कारखान्यात दुषित घटक फारशी प्रक्रिया न करता नद्यांमध्ये सोडून देतात असेही या तज्ज्ञांना आढळले आहे. या शिवाय नागरीकरणामुळे अनेक नद्यांमध्ये सांडपाणीही सोडले जाते. हे प्रदुषिकरण असेच सुरू राहीले तर काही वर्षानंतर या नद्यांची गटारे होतील असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे.
मलेरियाबाबत पालिकेची दिशाभूलः राज ठाकरे !मलेरियाबाबत मुंबई महापालिका दिशाभूल करीत असून मृतांचे आकडेवारी चुकीची देत असल्याचा आ
मराठमोळ्या तेजस्विनीचा विश्वविक्रमी नेम !
जर्मनीतील म्युनिक येथील जागतिक नेमबाजी स्पर्धेत ५० मीटर रायफल प्रोनमध्ये अचूक नेम साधत भारताची नेमबाज तेजस्विनी सावंत हिने सुवर्णपदक व विश्वविक्रमाला गवसणी घालण्याची दुहेरी कामगिरी नोंदवली. रशियाच्या मरिना बोबकोवाच्या १२ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी साधण्याची किमयाही तिने साधली. असा पराक्रम करणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. हा विश्वविक्रम साध्य केल्यानंतर तेजस्विनीच्या कोल्हापूरमध्ये आनंदाला भरते आले आहे. उपनगरात अधिकृत शेअर रिक्षा ट्रॅफिकवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच रिक्षावाल्यांच्या अरेरावीला आळा घालण्यासाठी रेल्वे स्थानकापासून वाहतुकीसाठी आता शेअर रिक्षाची यंत्रणा अधिकृतरीत्या सुरु करण्यात येणार आहे. वाहतूक तज्ञ आणि प्रवाशांनी या योजनेचे स्वागत केले आहे. या योजनेचा शुभारंभ लवकरच बांद्रा पूर्व येथे वाहतूक आयुक्त दिलीप जाधव यांच्या हस्ते होणार आहे. बांद्रा रेल्वे स्थानक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर प्रवाशांना शेअर रिक्षाने प्रवास करता येईल. या मार्गासाठीचे मीटरद्वारे भाडे १२ रुपये आहे मात्र शेअर रिक्षाने हेच अंतर ५.५० रुपयांत पार करता येईल. दोन महिन्यांच्या कालावधीत सुमारे ५० रिक्षा स्टँड उपनगरात स्थापन करण्यात येणार आहेत. या यंत्रणेचा बेस्टच्या कमाईवर होणारा परिणाम अभ्यासणार असल्याचं तसंच कमी नफा होणा-या मार्ग बंद करण्यासंबंधी विचार होत असल्याचं बेस्टचे महाव्यवस्थापक ओ पी गुप्ता यांनी सांगितलं.
आंदोलन कराल, तर कारवाई !खैरलांजी हत्याकांड प्रकरणी सातत्याने न्यायाची बाजू घेणा-या सुप्रसिद्ध लेखिका उर्मिला पवार यांना समतानगर पोलीस ठाण्याने पत्राद्वारे कोणत्याही प्रकारच्या आंदोलनात भाग घेण्यास मनाई करणा-या तसेच त्यांनी भाग घेतल्यास कारवाईच्या इशारा दिला आहे. या प्रकाराचा निषेध विविध स्तरांतील मान्यवरांनी केला आहे. हायकोर्टाने दिलेल्या खैरलांजी निकालाच्या आदल्या दिवशीच पत्र पोलिसांनी पवार यांना दिले होते. विषमता, भेदभाव, शोषण, अन्याय-अत्याचार यांच्याविरुद्ध लढण्याच्या लेखिकेच्या आविष्कार स्वातंत्र्यावरच त्यामुळे गदा आली असल्याचे या मान्यवरांनी म्हटले आहे.
|




ई कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठीही खासगी आणि सरकारी सहभागातून प्रकल्प उभारला जाणार आहे. संगणक, मोबाईल फोन, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांचा कचर्यात समावेश होतो. मुंबईत दरवर्षी 11 हजार टन तर राज्यात किमान 20 हजार टन ई कचरा तयार होतो.
ट्रॅफिकवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच रिक्षावाल्यांच्या अरेरावीला आळा घालण्यासाठी रेल्वे स्थानकापासून वाहतुकीसाठी आता शेअर रिक्षाची यंत्रणा अधिकृतरीत्या सुरु करण्यात येणार आहे. वाहतूक तज्ञ आणि प्रवाशांनी या योजनेचे स्वागत केले आहे. या योजनेचा शुभारंभ लवकरच बांद्रा पूर्व येथे वाहतूक आयुक्त दिलीप जाधव यांच्या हस्ते होणार आहे. बांद्रा रेल्वे स्थानक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर प्रवाशांना शेअर रिक्षाने प्रवास करता येईल. या मार्गासाठीचे मीटरद्वारे भाडे १२ रुपये आहे मात्र शेअर रिक्षाने हेच अंतर ५.५० रुपयांत पार करता येईल. दोन महिन्यांच्या कालावधीत सुमारे ५० रिक्षा स्टँड उपनगरात स्थापन करण्यात येणार आहेत. या यंत्रणेचा बेस्टच्या कमाईवर होणारा परिणाम अभ्यासणार असल्याचं तसंच कमी नफा होणा-या मार्ग बंद करण्यासंबंधी विचार होत असल्याचं बेस्टचे महाव्यवस्थापक ओ पी गुप्ता यांनी सांगितलं.
