पावसाची कृपा; धरणे भरली
जखमी झालो, तरी दहीहंडी फोडणार!दहीहंडीचा सराव करताना तो सहाव्या थरावरून पडला... डोक्याला मार लागून २ टाके पडले... तरीही त्याची जिद्द कमी झालेली नाही... यंदा मार लागला तरी पुढच्या वषीर्ही गोविंदात सहभागी होण्याचा त्याचा निश्चय आहे! या मुलाचे नाव आहे विरेंद परशुराम भोईर. वय १४ वर्षे. कोटकर गावातील राघोबादेव गोविंदा मंडळाचा सराव सुरू होता. तीन वर्षांपूवीर् स्थापन झालेल्या या मंडळाने गुरूपौणिर्मेपासून सरावाला सुरुवात केली. विरेंदही या मंडळात आहे. नेहमी तो आपल्या मावसभावाच्या खांद्यावर, सातव्या थरावर चढतो. प्रशिक्षक असलेल्या कैलास पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पाचव्या थराच्या उंचीपासून सुरुवात करण्यात आली. परंतु, १५ दिवसांच्या सरावानंतर सहाव्या थराचा सराव सुरू असताना विरंेद सहाव्या थरावरून खाली पडला. त्याला तातडीने हॉस्पिटलात नेण्यात आले. त्याच्या डोक्याला २५ टाके पडले.
सारे प्रवासी गणपतीचे !एसटी, खासगी गाड्या असो की कोकण रेल्वे... गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांसाठी ही साधनेच फक्त. चोहीकडे विखुरलेल्या चाकरमान्यांचे थवेच्या थवे निघतात 'चवथ' साजरी करायला. गणेश चतुर्थी आणि कोकणचं नातं फारच जुनं. पोटापाण्यासाठी कोकणातले तरुण मुंबई-पुण्यासारख्या मोठाल्या शहरांत जाऊन 'चाकरमानी' बनले आणि 'मनिऑर्डरवर जगणारा प्रांत' अशी कोकणची ओळख बनली. मात्र, या चाकरमान्यांनी आपल्या मातीशी असलेली नाळ तुटू दिली नाही. जत्रा, मे महिन्याची सुट्टी, गणपतीच्या निमित्ताने त्यांच्या पिढ्यान्पिढ्याकोकणात येत राहिल्या. या चाकरमान्यांसाठी कोकण हेच माथेरान, महाबळेश्वर, काश्मीर आणि कन्याकुमारी. वर्षभरातून एक-दोनदा मिळणारी हक्काची रजा गावी जाण्यासाठी राखून ठेवायची हा त्यांचा शिरस्ता. एकवेळ मे महिन्यात जायला नाही मिळाले तरी चालेल पण गणपतीत कोकण मस्ट. एसटीचा लाल-पिवळा डबा, लक्झऱ्या, भाड्याच्या जीप, सुमो, क्वालिस... टूबायटू पुशबॅक आणि नंतर आलेली कोकण रेल्वे... प्रवासाची अशी अनेक स्थित्यंतरे चाकरमान्यांच्या पिढ्यांनी पाहिली. ऐपतीप्रमाणे अनुभवलीही पण खऱ्या कोकणी माणसाचा जीव एसटीवरच. 'आमका बाबा यस्टीच बरी वाटता. गाडी बंद पडली तरी यस्टीवाले प्रवाशांक वाऱ्यावर नाय सोडूचे. दुसऱ्या गाडीत भरून मार्गाक लावतले. लक्झरीवाल्यांचो काय भरवसो हा? गाडी बंद पडली तर मेल्यांका सोताचीच जास्त काळजी'... मालवण-वंेगुर्लासारख्या 'अस्सल' कोकणात जाणारे जुने चाकरमानी आजही एसटीला असे सटिर्फिकेट देतात. ही आपुलकी आयुष्यातल्या सोबतीतून आलेली.
खासगी शाळांना फीवाढीचा मुक्त परवाना !खासगी शाळांची फी ठरवण्याचा अधिकार संबंधित विनाअनुदानित शाळांनाच आहे, राज्य सरकारला नाही, अशा शब्दांत मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला मोठी चपराक लगावली आहे. फी वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी समिती नेमण्याबाबतचे सरकारचे दोन्ही जीआर कोर्टाने रद्द केले आहेत. कोर्टाच्या या आदेशामुळे पालकांचे धाबे दणाणले आहेत. खासगी विनाअनुदानित शाळांच्या बेसुमार फीवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विभागीय उप संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याबाबतचा जीआर राज्य सरकारने गेल्या जुलै महिन्यात जारी केला होता. परंतु विनाअनुदानित शाळाचालकांच्या संघटनेने या शासन निर्णयाला आक्षेप घेत त्याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्याबाबतची सुनावणी आज झाली असता, मुंबई हायकोर्टाने सरकारचा जीआर रद्द करण्याचा आदेश दिला.
कुठे, किती बक्षिसाची हंडी पहा वेबसाइटवर
Dahikala Website has been launchedLast Updated (Tuesday, 31 August 2010 12:31) पुनर्बांधणीचा नवा फॉर्म्युला?ठाणे शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी क्लस्टर डेव्हलपमेंटपेक्षा अभिनव फॉर्म्युला शोधण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी राज्याचे मुख्य सचिव जे. पी. डांगे यांच्या अध्यक्षतेखाली नगरविकास सचिव मनुकुमार श्रीवास्तव, टी. सी. बेंजामिन, गृहनिर्माण सचिव सीताराम कुंटे आणि ठाणे महापालिकेचे आयुक्त आर. ए. राजीव यांचा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. ही समिती येत्या तीन महिन्यांच्या आत या पुनर्बांधणीचा फॉर्म्युला ठरविणार आहे. कळव्यातील सोनीबाई भुवन ही इमारत कोसळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद आव्हाड यांनी येथील धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी 'क्लस्टर डेव्हलपमेंट' ही योजना राबविण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत ही समिती स्थापन करण्याचा निर्णय झाल्याचे जितेंद आव्हाड यांनी सांगितले. या पुनर्बांधणीसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनीही पाठपुरावा सुरू ठेवला आहे. स्कायवॉक बनलेत बेघरांचे 'घर' !पादचा-यांच्या सोयीसाठी एमएमआरडीएने बांधलेले स्कायवॉक सध्या बेघर लोकांसाठी आसरा बनले आहेत. मुंबईसारख्या शहरात स्वतःचं घर हे दिवास्वप्न आहे. बेघर लोकांसाठी आतापर्यंत फुटपाथ हा आधार होता. पण आता त्यांनी स्कायवॉकचा अनधिकृतपणे निवा-यासाठी वापर करायला सुरूवात केली आहे. स्कायवॉक बांधणी आणि देखभालासाठी जबाबदार असलेल्या एमएमआरडीएने मात्र याप्रकरणी कोणतीही उपाययोजना केलेली नाही. पादचा-यांना वाहनांच्या गर्दीतून सुटका करून देणारे स्कायवॉक रात्री मात्र अनेकांसाठी हक्काचा निवारा बनले आहेत. अंधेरी पुर्वेला असणारा स्कायवॉक रोज रात्री दोनशे ते अडीचशे लोकांसाठी घर बनतो. अंधेरीसह बांद्रा पश्चिमेला असणारा स्कायवॉक भिकारी लोकांचा अड्डा बनला आहे. तर सांताक्रुझ येथील स्कायवॉकच्या काही जागेवर फेरीवाल्यांनी ताबा मिळवला आहे. घाटकोपर येथे बांधण्यात आलेल्या स्कायवॉकचा पादचारी फारसा वापर करत नाही. यामुळे स्कायवॉकचा वापर दिवसा प्रेमी युगुलं तर रात्रीच्या वेळी काही कामगार झोपण्यासाठी करतात. यासंदर्भात पोलिसांना विचारलं असता , हे कामगार मेट्रो रेल्वे कन्स्ट्रक्शन साइटवरील आहेत असं त्यांनी सांगितलं. एमएमआरडीएने नियुक्त केलेले सुरक्षारक्षक मात्र याकडे कानाडोळा करत आहेत.
दारिद्र्यरेषेची 'व्याख्या' बदला !देशातील गरिबी वाढत असताना सरकार मात्र त्यांच्या संख्येची आकडेमोड करत बसली आहे. या वेळी दारिद्यरेषेची पुनर्मांडणी करण्याची आवश्यकता आहे. वर्षाला एक लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्व कुटुंबांचा समावेश दारिद्यरेषेखालील वर्गात करून कामगार व गरीब जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केली. ही मागणी मान्य न झाल्यास संसदेला घेराव घालून प्रखर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. ठाण्यात आयोजित भारतीय जनता कामगार महासंघाच्या दुसऱ्या अधिवेशनात गडकरी यांनी ही मागणी केली. येत्या २५ सप्टेंबरला 'कामगार राष्ट्रीय महासंघ' स्थापन करण्याची घोषणाही गडकरी यांनी या वेळी केली. देशात ४२ कोटी असंघटित कामगार असून त्यांना काँग्रेसच्या सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. मुंबई, ठाण्यामध्ये संघटित कामगारांचे अनेक लढे आतापर्यंत झाले. त्यातील काही यशस्वी झाले तर काही अजूनही चालू आहेत. पण त्यांच्या प्रश्नांविषयी सहानुभूती दाखवणे तर दूरच पण गिरण्यांच्या जागांवर मॉल आणि टॉवर यांना परवानगी देऊन कामगारांच्या जखमेवर काँग्रेस सरकार मीठ चोळत आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभारण्याची घोषणाही त्यांनी केली.
|




गिरगावातील दहा तरूण गोविंदाप्रेमींनी जीपीएस ग्लोबल पोझिनिंग सिस्टीम तंत्रज्ञानाचा आधार घेत कोणत्या रस्त्यावर मोठ्य़ा हंड्या बांधण्यात आल्या आहेत याची माहिती माऊसच्या एका क्लिकवर कळणार आहे. आयटी इंजिनीअर असलेला सचिन शहाणे यंच्या पुढाकाराने राजेश आंबेरकर,प्रशंात वेंगुर्लेकर,आदित्य मोरे या मित्रांनी 
