
आपण कॉम्प्युटर रोजच वापरतो पण, सुरुवातीला जेवढा तो फास्ट चालतो, त्यापेक्षा खूपच हळू ऑपरेट व्हायला लागतो. सगळं पटापटा करायची सवय लागली, की असा स्लो कॉम्प्युटरनको वाटतो. मग कॉम्प्युटरवर नुसतंच भरपूर फाईल्स लोड करून ठेवण्यापेक्षा जर अधून-मधून त्याची काळजी घेतली. तर कॉम्प्युटर स्लो पडणार नाही.
तुम्ही दिलेली ऑर्डर पूर्ण करायला कॉम्प्युटरनं वेळ घ्यायला सुरुवात केली, की समजा देखभालीची वेळ आली आहे. सगळ्यात आधी, कॉम्प्युटरवर एक चांगलं अँटीव्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून ठेवावं व्हयरसचा धोका कायमच असतो. इंटरनेट असेल, तर तो धोका अजूनच वाढतो. त्यामुळे, चांगला अँटीव्हायरस असणं कधीही उपयोगी पडू शकतं सगळा कॉम्प्युटर नीट स्कॅन केला, की पुन्हा चालवून बघा.
तसंच, डेक्सटॉपवर कुठलीही फाईल किंवा प्रोग्राम थेट सेव्ह करू नका. डेक्सटॉपवर कमीत कमी आयकॉन्स असावेत. भरपूर आयकॉन्स असले की स्पीड कमी होऊ शकतो. ठराविक काळानंतर डिक्स क्लीन अप करणं गरजेचं असतं इंटरनेट वापरताना किंवा दुसरी कामं करताना, त्या फाईल्स टेंपररी स्वरुपात साठवल्या जातात.
इंटरनेटवरील पेजेस डाऊनलोड होताना त्या तात्पुरत्या आपल्या कॉम्प्युटरवर सेव्ह केल्या जातात. त्या डिलीट करणं गरजेचं असतं यासाठी, स्टार्ट मेनुमध्ये ऑल प्रोग्रॅम्स मध्ये जाऊन ऍक्सेसरीज या ऑप्शनमध्ये डिस्क क्लिन अप सिलेक्ट करा. मग एक एक ड्राईव्ह निवडून क्लिनिंग सुरु करा. मग तिथे आपल्याला नको असलेल्या फाईल्सचे ऑप्शन दाखवतात. सिलेक्ट ऑल करून किंवा विशिष्ट प्रकार निवडून आपण त्या फाईल्सचे ऑप्शन दाखवतात. सिलेक्ट ऑल करून किंवा विशिष्ट प्रकार निवडून आपण त्या फाईल्स डिलीट करू शकतो. प्रत्येक फाईलची साईज जरी छोटी असली, तरीही खूप फाईल्स साठल्या की एकदम मोठी जागा व्यापली जाते.
त्याचप्रमाणे, या ऍक्सेसरीज ऑप्शनमध्ये डिस्क फ्रँगमेंटेशन नावाचाही ऑप्शन असतो. आपण एखादी फाईल सेव्ह करताना ती हार्ड डिक्सवर सेव्ह केली जाते. म्हणजेच त्या फाईलला एक विशिष्ट जागा नेमून दिलेली असते. जेव्हा रिकामी होते. त्या डा्रईव्हच्या एकूण साईजमध्ये जरी ती जागा रिकामी दिसली, तरीही नवीन फाईल सेव्ह करताना त्याच जागी सेव्ह केली जात नाही समजा, एक ते दहा या लोकेशन्सवर आपण फाईल सेव्ह केल्या आहेत. त्यानंतर चार, सात, नऊ या लोकेशनवरील फाईल ओपन करण्याची ऑर्डर दिली, की प्रोसेसनुसार एक ते दहा सगळीकडे शोधली जाते. या मधल्या जागा रिकाम्या असल्यामुळे तेवढा वेळ वाया जातो. डिप्रॅगमेंटेशन केलं की या मधल्या जागा भरून निघतात. मात्र डिप्रॅगमेंटेशन करताना त्या ड्राईव्हवरच्या डेटाचा आधीच बॅक अप घेऊन ठेवावा, कारण कधी कधी यात डेटा करप्ट होण्याचीही शक्यता असते.
-सुधीर मोकाशे.......