नाव :- दत्ताराम (बाळा) गवस
पत्ता :- ई/205, यश आनंद सह गृह. संस्था, विष्णुनगर, नौपाडा, ठाणे
शिक्षण :- बी.ए. दहावीपर्यंत शिक्षण डॉ. बेडेकर विद्यामंदिर, नौपाडा, ठाणे येथे व पुढील शिक्षण ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे येथे
व्यवसाय :- नोकरी एका खाजगी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर या पदावर
जन्मतारीख :-30 मे
कौटुंबिक पार्श्वभूमी :- चार भावंड, तीन भाऊ, एक बहिण
वडील शिवसेनेचे संस्थापक सदस्य असल्यामुळे लहानपणापासून घरात शिवसेनेचे वातावरण. लहानपणापासूनच शिवसेनेच्या नेत्यांकडे येणे-जाणे असल्यामुळे शिवसेनेचे विचार लहानपणापासूनच मनावर बिंबवले गेले. वडील शिवसेनेचे बावीस वर्ष विभाग प्रमुख.
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर ज्ञानसाधना महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून विविध आंदोलन व कार्यालयांमध्ये सक्रीय सहभाग.
त्याचप्रमाणे शिवसेनेच्या विविध आंदोलनांमध्ये लहानपणापासून सक्रीय सहभाग शिवसेना शैक्षणिक विभागातर्फ्े घेण्यात येणाऱ्या सराव परीक्षेमध्ये सुरुवातीपासून सहभाग भात विविध जबाबदाऱ्या घेतल्या. एस.एस.सी. सराव परीक्षेचा निकाल संगणीकृत करण्यात सिंहाचा वाटा. गेल्या चार-पाच वर्षात एस.एस.सी. सराव परीक्षेची सर्व धुरा खांद्यावर घेऊन यात कालपरत्वे विविध बदल करण्यात पुढाकार त्याचप्रमाणे गेल्या चार-पाच वर्षापासून स्पर्धा परीक्षेसाठी (बँक भरती, रेल्वे भरती इ.) विविध प्रकारची मार्गदर्शन शिबिर राबवली. त्याचप्रमाणे गेल्या चार वर्षांपासून स्पर्धा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग चालू आहेत. शेकडो विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेऊन परीक्षा पास झाले आहेत. त्याचप्रमाणे विविध बँका व आस्थापनांच्या परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी बँकेतील उच्च पदावरील अधिकाऱ्यांकडून मुलाखतीसाठी आवश्यक प्रशिक्षण दिले जाते व या मुलाखतीचा सराव घेतला जातो. याचा फ्ायदा घेऊन गेल्या तीन-चार वर्षात दोनशे ते तीनशे मराठी तरुण-तरुणींना या आस्थापनांमधून नोकरी मिळाली आहे व त्यांचे भविष्य सुरक्षित झाले आहे. त्याचप्रमाणे एस.एस.सी.च्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा व मार्गदर्शन शिबीरे आयोजित केले जातात.
..2..
शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख श्री. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षीपासून 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यात अतिशय महत्वाची व त्यांच्या भविष्याला कलाटणी देणाऱ्या ण्र्ंिऊ परीक्षेचे त्याचप्रमाणे मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई व ठाण्यातील नामवंत शिक्षकांकडून या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले होते. त्याचप्रमाणे ण्र्ंिऊच्या वेळापत्रकाप्रमाणे व विद्यार्थ्यांच्या मनात असलेली या परीक्षेची भिती दूर करण्यासाठी ण्र्ंिऊच्या सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. अशा प्रकारचा प्रयत्न प्रथमच एखाद्या राजकीय पक्षाकडून झाला असेल. याचा विद्यार्थ्यांना फ्ार मोठा फ्ायदा झाला.
त्याचप्रमाणे शिवसेना ठाणे जिल्हा शाखेमार्फ्त गेल्या वर्षी दहावीच्या विद्यार्थ्यासाठी राबविण्यात आलेल्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या कार्यक्रमात सक्रिय सहभाग.
शिवसेना ठाणे जिल्हा शाखेतर्फ्े आयोजित गणेश दर्शन कार्यक्रमात सक्रिय सहभाग. त्याचप्रमाणे पक्षातर्फ्े घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाच्या तयारीपासून या कार्यक्रमात विशेष जबाबदाऱ्या घेऊन सक्रीय सहभाग.
सर्व कार्यक्रम, सभा, निवडणूका यामध्ये विविध प्रकारच्या परवानग्या मिळविण्यात सहभाग.
त्याचप्रमाणे विभागात विविध प्रकारची शिबिरे राबविण्यात सुरुवातीपासूनच सहभाग. यामध्ये नेत्रचिकित्सा, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर यामध्ये सक्रीय सहभाग. त्याचप्रमाणे श्री. विलास हुसे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या पोस्टमनना टोप्या वाटप या कार्यक्रमात सक्रीय सहभाग.
स्वतः 51 वेळा रक्तदान करुन समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे.
हयाचप्रमाणे शैक्षणिक, सामाजिक समस्यांमध्ये मदत करायला सदैव तत्पर.
1999 साली मा. धर्मवीर श्री. आनंद दिघे साहेबांनी उपप्रभागप्रमुख पद दिले त्याचप्रमाणे 2006 साली उपविभाग प्रमुख पदी नियुक्ती.
सर्व निवडणुकांमध्ये माझ्या प्रभागामध्ये पक्षाला आघाडी मिळवून देण्यामध्ये महत्वाचा सहभाग.