Marathi Marathi Moot Court - The Government Law College
ब्रेनमॅपिंग घटनाविरोधी!एखाद्या गुन्हेगाराकडून सत्य वदवून घेण्यासाठी करण्यात येणार्या नार्को, ब्रेनमॅपिंग, पोलिग्राफी चाचण्या घटनाविरोधी असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. या चाचण्यांविरोधात 25 जानेवारी 2008 रोजी एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करताना सरन्यायाधीश के. जी. बालकृष्णन, न्या. जे. एम. पांचाळ आणि बी. एस. चौहान यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. पूर्वपरवानगीशिवाय एखाद्या संशयिताची नार्को चाचणी घेणे म्हणजे त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखे असून ते घटनेच्या कलम 20 (3)चे उल्लंघन आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. नार्को चाचणी म्हणजे काय? नार्को चाचणी उत्तेजक द्रव्य देऊन घेण्यात येते. उत्तेजक द्रव्यात अमली पदार्थांचा अंश असतो. तो शरीरात गेल्यानंतर त्या व्यक्तींची विचारशक्ती काही काळासाठी खुंटते. परंतु या द्रव्याच्या अमलामुळे ती व्यक्ती मनामध्ये जे दडले आहे ते खरे बोलते असा ही चाचणी घेणार्या तज्ज्ञांचा दावा आहे. आतापर्यंत नार्को चाचणी न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात आलेली नाही. मात्र या चाचणीचा तपासाची दिशा ठरविण्यासाठी मोठा उपयोग झाला आहे.गुरुवार, दि. 6 मे 2010
Write comment (20 Comments)
|
|
|
Credit Cards Profitable Use
| Profitable Credit Cards Users and Credit Cards Members |
|




