Samagra Konkan Darshan: समग्र कोकण- दर्शन :: Marathi ...
नर्सरीतले डोनेशन रोखणे गरजेचे !उच्चशिक्षणासाठी लाखो रुपयांचे डोनेशन स्वीकारले जात असून त्यावर अंकुश ठेवण्याची चर्चा नेहमीच होते. परंतु, ज्या ठिकाणाहून शिक्षणाचा श्रीगणेशा होतो, त्या नर्सरीतल्या प्रवेशासाठीही भरमसाठ डोनेशन घेतले जाते. ही डोनेशन पद्धती रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याची आवश्यकता असल्याचे मत राज्याचे शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील गुणवंत शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा गुरुवारी झाला. त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब थोरात उपस्थित होते. ठाणे आणि रायगड परिसरातील शैक्षणिक संस्थांचा व्याप वाढत असल्याने या दोन जिल्ह्यांसाठी उपसंचालक नेमण्याबाबतचा विचार सुरू असल्याचेही थोरात यांनी या वेळी सांगितले. शिक्षणक्षेत्रात केरळपाठोपाठ महाराष्ट्राचा नंबर लागतो. हा दर्जा टिकविण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्यायला हवा, असे प्रतिपादनही थोरात यांनी केले. ठाणे जिल्ह्यासाठी कृषी विज्ञान केंद उपलब्ध करून द्या, अशी मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी या प्रसंगी बोलताना केली.
Write comment (0 Comments)
|
राष्ट्रवादीची अमेरिकेत कंपनी ! शरद पवार बॉस असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (एनसीपी) आता अमेरिकेत चक्क कंपनी स्थापन केली आहे. एनसीपी नॉर्थ अमेरिका इनकॉर्पोरेटेड असे कंपनीचे नाव आहे. अर्थात पवार यांचे विश्वासू सहकारी सांगतात की, साहेब काय करतील हे सांगता येत नाही हेच त्यांच्या गेल्या चार दशकांच्या राजकीय प्रवासाच्या यशाचे इंगित आहे. गेल्याच आठवड्यात पक्षाचे अधिवेशन, पवार यांच्या प्रतिष्ठेला साजेसे, म्हणजे न्यूयॉर्क येथील एका आलिशान हॉटेलमध्ये पार पडले होते. तिथेच या कंपनीच्या स्थापनेचा निर्णय पवारांनी घेतल्याचे समजते. अमेरिकेत, सरकारी निर्णय बदलण्यासाठी अथवा सरकारी निर्णय आपल्याला सोयीचे होण्यासाठी लॉबिंग करण्याची पद्धत आहे. यासाठी कंपन्या स्थापन केल्या जातात आणि कंपनीसाठी बरीच मोठी माणसे काम करतात. कामाचा एक भाग म्हणून, अमेरिकेतील राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या जातात. त्यांनी आपली बाजू मांडावी यासाठी मौल्यवान भेटवस्तू दिल्या जातात असेही म्हटले जाते. राष्ट्रवादीची कंपनी नेमके तेच करणार आहे असे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले. कंपनीचे ज्येष्ट अधिकारी लाल ददलानी यांनी ही माहिती दिली. राज्यभर पावसाचा दणका श्रावणाच्या अखेरच्या दिवशी, बुधवारी तुफान बरसलेल्या पावसाचा पूर्व विदर्भाला दणका बसला. पूर्व विदर्भासह नगर व पुणे जिल्ह्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झालेल्या पावसाचा जोर येत्या आठवड्यात आणखी वाढण्याचा अंदाज हवामान खात्याचा आहे.पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या चार जिल्ह्यांत गेल्या २४ तासांत मुसळधार पावसामुळे चौघांचा मृत्यू झाला. ५०० गावांना त्याचा दणका बसला. गोसीखुर्द धरणाचे ३३ दरवाजे, तर ईरई धरणाचे सहा दरवाजे उघडावे लागले. त्यामुळे वैनगंगा व ईरई नद्यांना पूर आला असून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली, सिरोंचा, भामरागड व एटापल्ली या तालुक्यांना पुराचा फटका बसला. तेथे दोन हजार घरांची पडझड झाली. गोंदिया व भंडारा जिल्ह्यांतील १०० गावांना फटका बसला. चंदपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात १३० घरांची पडझड झाली. गोसीखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडल्याने वैनगंगेने धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक गावांचा संपर्क त्यामुळे तुटला आहे. 'म्हाडा'ची ३१ हजार नवीन घरे ** मध्यमवर्गासाठी ३१ हजार घरे उपलब्ध होणार म. टा. प्रतिनिधी । मुंबई विक्रोळी पूर्वेस रेल्वेलाइनपासून ते खाडीपर्यंतच्या विस्तीर्ण क्षेत्रात पसरलेल्या कन्नमवार नगर आणि टागोर नगर या कष्टकरी मध्यमवर्गीयांच्या वस्तीचा पुनर्विकास करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयावर म्हाडाने शिक्कामोर्तब केले असून त्यातून अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटासाठी सुमारे ३१ हजार नवीन घरे उपलब्ध होणार आहेत. म्हाडा मंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत पुनर्विकासाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या कॉलनींच्या विकासाबरोबरच अतिरिक्त ३१ हजार ३७० घरे उपलब्ध होऊ शकतील. लॉटरी पद्धतीने या घरांची विक्री करण्यात येईल. सध्या या कॉलनींमध्ये अल्प (३०० चौरस फूट) आणि अत्यल्प (४५० चौरस फूट) गटातील सुमारे १६ हजार घरे आहेत. त्यात कन्नमवार नगरमधील १० हजार ५०० आणि टागोेर नगरमधील तीन हजार ६०० घरांचा समावेश आहे. तर दोन हजार संक्रमण शिबिरे आहेत. फांदी पडून आणखी एकाचा मृत्यू
|




शरद पवार बॉस असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (एनसीपी) आता अमेरिकेत चक्क कंपनी स्थापन केली आहे. एनसीपी नॉर्थ अमेरिका इनकॉर्पोरेटेड असे कंपनीचे नाव आहे. अर्थात पवार यांचे विश्वासू सहकारी सांगतात की, साहेब काय करतील हे सांगता येत नाही हेच त्यांच्या गेल्या चार दशकांच्या राजकीय प्रवासाच्या यशाचे इंगित आहे.
श्रावणाच्या अखेरच्या दिवशी, बुधवारी तुफान बरसलेल्या पावसाचा पूर्व विदर्भाला दणका बसला. पूर्व विदर्भासह नगर व पुणे जिल्ह्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झालेल्या पावसाचा जोर येत्या आठवड्यात आणखी वाढण्याचा अंदाज हवामान खात्याचा आहे.पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या चार जिल्ह्यांत गेल्या २४ तासांत मुसळधार पावसामुळे चौघांचा मृत्यू झाला. ५०० गावांना त्याचा दणका बसला. गोसीखुर्द धरणाचे ३३ दरवाजे, तर ईरई धरणाचे सहा दरवाजे उघडावे लागले. त्यामुळे वैनगंगा व ईरई नद्यांना पूर आला असून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली, सिरोंचा, भामरागड व एटापल्ली या तालुक्यांना पुराचा फटका बसला. तेथे दोन हजार घरांची पडझड झाली. गोंदिया व भंडारा जिल्ह्यांतील १०० गावांना फटका बसला. चंदपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात १३० घरांची पडझड झाली. गोसीखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडल्याने वैनगंगेने धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक गावांचा संपर्क त्यामुळे तुटला आहे.
** मध्यमवर्गासाठी ३१ हजार घरे उपलब्ध होणार म. टा. प्रतिनिधी । मुंबई विक्रोळी पूर्वेस रेल्वेलाइनपासून ते खाडीपर्यंतच्या विस्तीर्ण क्षेत्रात पसरलेल्या कन्नमवार नगर आणि टागोर नगर या कष्टकरी मध्यमवर्गीयांच्या वस्तीचा पुनर्विकास करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयावर म्हाडाने शिक्कामोर्तब केले असून त्यातून अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटासाठी सुमारे ३१ हजार नवीन घरे उपलब्ध होणार आहेत. म्हाडा मंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत पुनर्विकासाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या कॉलनींच्या विकासाबरोबरच अतिरिक्त ३१ हजार ३७० घरे उपलब्ध होऊ शकतील. लॉटरी पद्धतीने या घरांची विक्री करण्यात येईल. सध्या या कॉलनींमध्ये अल्प (३०० चौरस फूट) आणि अत्यल्प (४५० चौरस फूट) गटातील सुमारे १६ हजार घरे आहेत. त्यात कन्नमवार नगरमधील १० हजार ५०० आणि टागोेर नगरमधील तीन हजार ६०० घरांचा समावेश आहे. तर दोन हजार संक्रमण शिबिरे आहेत.
दक्षिण मुंबईत जीपीओजवळ झाडाची फांदी सुमोवर कोसळून त्याखाली रहिमतुल्ला शेख नावाच्या ड्रायव्हरचा मृत्यू झाला . रोजगाराच्या निमित्ताने तो चेन्नईहून मुंबईला आला होता .मुंबईत मागील चार दिवसांत झाड पडल्याने मृत्यू होण्याची ही दुसरी दुर्घटना आहे . याशिवाय गेल्या दोन आठवड्यांत , फांदी पडल्याने दोन विद्यार्थीनी जखमी झाल्या आहेत . यापैकी एकीवर पाय गमावण्याची वेळ आली आहे .मुंबई महानगरपालिका वेळच्या वेळी झाडे छाटत नाही . या कामासाठी नेमलेल्या ठेकेदारांवरही पालिकेच्या अधिका - यांचे नियंत्रण नाही . अशा अवस्थेमुळे मुंबईत अशा घटनांचे प्रमाण वाढेल अशी भीती वृक्षतज्ज्ञ करत आहेत .