Marathwada Capital Aurangabad batmya marathwada
पेट्रोल-डिझेलचा पुन्हा भडकाशहर विकासाकरिता निधी उपलब्ध व्हावा यासाठी पुणे, बारामतीसह राज्यातील ७ शहरांत पेट्रोल आणि डिझेलवरील विक्री करात वाढ करण्यात येणार असून, त्यामुळे या शहरांमध्ये पेट्रोल ५० ते ५५ पैशांनी, तर डिझेल १.२० रुपयांनी महागणार आहे, अशी घोषणा अर्थराज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज केली. महिनाभरापूर्वीच युरो-४ पेट्रोलमुळे दरवाढीचा फटका बसलेल्या पुणेकरांना जून पासून पुन्हा एकदा दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे.
१ जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. पेट्रोल-डिझेल महाग होणार असलेल्या शहरांमध्ये पुण्यासह औरंगाबाद, अमरावती, नंदुरबार, बारामती, सोलापूर आणि नागपूर यांचा समावेश आहे. या पैशांतून मिळणारा निधी संबंधित शहरांच्या विकासासाठी वापरला जाणार आहे, असे सत्तार यांनी सांगितले.
Write comment (24 Comments)
|
सायंकालीन न्यायालयाचे उदघाटनमहाराष्ट्र राज्यात पहिल्या सायंकालीन न्यायालयाचे औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारी (ता.29) रोजी सायंकाळी ज्येष्ठ विधिज्ञ के.यु. निकम यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी प्रधानजिल्हा न्यायाधीश ता.वि.नलवडे, जिल्हा न्यायाधीश आर.आर.गांधी, वकील संघाचे अध्यक्ष ऍड.अशोक ठाकरे, सचिव ऍड.चेतन चव्हाण यांची उपस्थिती होती.
भीषण अपघातात ११ ठारअंबेजोगाई-कळंब रस्त्यावर तवेरा गाडीला शुक्रवार सकाळी झालेल्या अपघातात अकरा ठार तर सात जण गंभीर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथील चॉंदखॉं इस्माईल पठाण (वय 55, रा. बायजीपुरा) कुटुंबीय तवेरा गाडीतून कळंब येथे एका घरगुती कार्यक्रमानिमित्त गेले होते. कंळंबहून परतीच्या मार्गावर असताना ते रस्ता चुकले होते. अंबेजोगाई येथील रस्ताही कमी रहदारीचा असल्यामुळे गाडी वेगाने चालली होती. एका पुलावर उसाचा ट्रक टायर पंक्चर झाल्यामुळे कडेला उभा होता. चालकाचे नियंत्रण सुटल्याने तवेरा गाडी उसाच्या ट्रकवर जाऊन जोरात आदळली. यावेळी झालेल्या अपघातात पठाण कुटुंबीयांतील अकरा जण जागीच ठार झाले. तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन लहान मुले आणि दोन महिलांचा समावेश आहे. जखमींवर अंबेजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर तिघांची प्रकृती गंभीर असल्याने औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.
मराठवाड्यात बॉक्सिंगच्या प्राथमिक सुविधा देणारपंचविसाव्या राष्ट्रीय ज्युनियर बॉक्सिंग स्पर्धेच्या निमित्ताने मराठवाडा विभागात बॉक्सिंगच्या प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्वीकारत असल्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी शुक्रवारी औरंगाबाद येथे घोषित केले. शहर बॉक्सिंग संघटना, महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 25 व्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. अतिक्रमणे काढण्याचे आदेशअंबाजोगाई - रहदारीस अडथळा होऊ लागल्याने व रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरू होणार असल्याने येत्या पंधरा दिवसांत शहरातील बांधकाम विभाग व नगरपालिकेच्या हद्दीतील अतिक्रमणे काढण्याचे आदेश तहसीलदारांनी गेल्या आठवड्यात झालेल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले होते. |




