Marathi Latest News, Breaking Online News | Maharashtra Times
संतुलित ग्राम योजना प्रभावी राबवणार !तामपानवाढीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात घोषित केलेेली पर्यावरण संतुलित ग्राम योजना सातारा जिल्ह्यात प्रभावीपणे राबवली जाणार असल्याची घोषणा पालकमंत्री रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केली. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गावाच्या लोकसंख्येइतकी झाडे लावून त्या तुलनेत किमान चार लाख तर कमाल १२ लाखांपर्यंत प्रोत्साहनपर निधी विकासकामांसाठी दिला जाणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक गावांनी हा निधी मिळवावा असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले. तापमानवाढीसाठी जिल्ह्यात यंदा २८ लाख झाडे लावण्याचा संकल्प त्यांनी केला. 'एक व्यक्ती, एक झाड' या उपक्रमातून झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी ग्रामस्थांनी स्वीकारावी असे आवाहनही त्यांनी केले.
Write comment (28 Comments)
|

मराठमोळ्या तेजस्विनीचा विश्वविक्रमी नेम !
जर्मनीतील म्युनिक येथील जागतिक नेमबाजी स्पर्धेत ५० मीटर रायफल प्रोनमध्ये अचूक नेम साधत भारताची नेमबाज तेजस्विनी सावंत हिने सुवर्णपदक व विश्वविक्रमाला गवसणी घालण्याची दुहेरी कामगिरी नोंदवली. रशियाच्या मरिना बोबकोवाच्या १२ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी साधण्याची किमयाही तिने साधली. असा पराक्रम करणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. हा विश्वविक्रम साध्य केल्यानंतर तेजस्विनीच्या कोल्हापूरमध्ये आनंदाला भरते आले आहे. |
पुण्यनगरी भिजली जलधारांनी!पावसाळ्याच्या तोंडावर पुण्यात आज पहिल्याच पावसाने जोरदार हजेरी लावली आणि दीड तासांत तब्बल २६.५ मिलिमीटर पाऊस पडला. मोठय़ा पावसामुळे अनेक रस्ते व चौक जलमय झाले. तसेच, सुमारे ५०-६० ठिकाणी झाडे व फांद्या पडल्यामुळे वाहतुकीतही अडथळे आले. परिणामी, सायंकाळी घराकडे परतणाऱ्या पुणेकरांना त्रास सहन करावा लागला. त्याचबरोबर पावसामुळे या उन्हाळ्यात पहिल्यांदाच वातावरणात सुखद गारवा अनुभवायला मिळाला.शहरामध्ये संध्याकाळी वादळ-वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे विविध ठिकाणी झाडाच्या फांद्या पडून वीजवाहिन्या तुटल्याने त्याचप्रमाणे यंत्रणेत बिघाड निर्माण झाल्याने संध्याकाळनंतर कोथरूड, पद्मावती, पर्वती, रास्ता पेठ व शिवाजीनगर विभागातील काही भागांचा वीजपुरवठा खंडित झाला होती. रात्री वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीची कामे सुरू होती.
‘धरण प्रकल्प वेळेत आणि निर्धारित किमतीत पूर्ण करा’केंद्राच्या कराराने राज्य सरकार जागे केंद्र सरकारच्या वेगवर्धित कार्यक्रमात मंजूर झालेल्या धरण प्रकल्पांची कामे नियोजित वेळेत आणि निर्धारित किमतीत पूर्ण न केल्यास त्याचा आर्थिक बोजा आता राज्य सरकारवर पडणार आहे. केंद्र सरकारने वेगवर्धित कार्यक्रमांतर्गत केलेल्या सामंजस्य कराराचा बडगा उगारल्याने खडबडून जागे झालेल्या राज्य सरकारने हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची तंबी अधिकाऱ्यांना दिली आहे.रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने वेगवर्धित पाटबंधारे विकास कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यांतर्गत राज्यांमधील रखडलेले लघु, मध्यम व मोठे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. याशिवाय गरज असलेल्या भागांतील प्रकल्पांना अर्थसहाय्य केले जाते. अशा प्रकल्पांची यादी राज्यांकडून मागविली जाते. ही यादी मंजूर करताना त्याबाबतचा सामंजस्य करार संबंधित राज्यांशी करण्यात येतो. या करारातील अटीनुसार वेगवर्धित कार्यक्रमात मंजूर झालेले प्रकल्प वेळेत आणि निर्धारित किमतीत पूर्ण झाले पाहिजेत. हे प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्यास आणि प्रकल्प खर्च वाढल्यास त्याचा बोजा संबंधित राज्यांनी उचलायचा आहे. |