मैत्री आणि विश्‍वासाचे नाते…

सिंधुदुर्ग

घरगुती गणपती सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सोनवडेकर श्री लिंग सार्वजनिक समाज, मुंबईतर्फे विविध वाड्यांतील विजेत्यांचा गौरव

कुडाळ : सोनवडेकर श्री लिंग सार्वजनिक समाज, मुंबईतर्फे यंदाही घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गावातील विविध वाड्यांमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेला गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सामाजिक संदेश, पर्यावरणपूरक सजावट, कलात्मकता, भक्तिभाव, विज्ञान, निसर्ग, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मता आदी विषयांना सजावटीतून प्राधान्य देण्यात आले.
संस्थेच्या कार्यकारी मंडळाने नियुक्त केलेल्या परीक्षकांनी प्रत्येक घरातील गणपती सजावटीचे परीक्षण करून गुणांकन केले. सजावटीबरोबरच सुरक्षितता, पर्यावरणपूरकता आणि सामाजिक संदेश या बाबींचाही विचार करण्यात आला. स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने प्रत्येक वाडीनिहाय प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांची निवड करण्यात आली.

देखाव्यातून सामाजिक संदेश
गावात गणपती सजावट स्पर्धा हा उपक्रम मागिल तीन वर्षांपासून यशस्वीरित्या राबविला जात आहे.त्याच फलित म्हणजे संस्थेचे सदस्य व ग्रामस्थ अमित पवार यांनी आपल्या गणपतीजवळ पुस्तकांचा उत्कृष्ट सजावट करून मोबाईलच्या युगात पुस्तक वाचनाची गरज असल्याचा एक सामाजिक संदेश दिला. आजच्या आधुनिक युगात मोबाईल आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे.माहिती, मनोरंजन आणि संवादासाठी मोबाईल अत्यंत आवश्यक आहे.परंतु ज्ञान विचारांची खोली आणि व्यक्तिमत्त्वाची जडणघडण या साठी पुस्तक वाचनाला पर्याय नाही. मोबाईलवर आपण अनेक गोष्टी पाहातो.पण पुस्तक आपल्याला विचार करायला शिकवते.मोबाईल वेळ खातो तर पुस्तक वाचलेला वेळ आपल्या आयुष्याला दिशा देतो.
दररोज काही वेळ मोबाईल बाजूला ठेवून एखादे चांगले पुस्तक वाचनाची सवय लावूया, आपल्या मुलांनाही मोबाईल पासून थोडे दूर ठेऊन, पुस्तकांची मैत्री करून देऊया. मोबाईल हातात असणे ही काळाची गरज आहे.पण पुस्तक हातात असणे ही ज्ञानाची गरज आहे. पुस्तक वाचनाची आवड असावी हा एक उत्कृष्ट सामाजिक संदेश आहे.

वाडीनिहाय विजेते
देऊळवाडी : प्रथम रवींद्र तुकाराम धुरी; द्वितीय सुधीर वसंत धुरी; तृतीय विष्णू रामदास गुरव.
बौद्ध वाडी : प्रथम अमित सोनवडेकर; द्वितीय गोविंद सोनवडेकर; तृतीय भाईनाथ सोनवडेकर.
फौजदार वाडी : प्रथम सुधीर बळीराम धुरी; द्वितीय गोपाळ मारुती परब; तृतीय भरत शंकर धुरी.
तळेकर वाडी : प्रथम वासुदेव अर्जुन धुरी; द्वितीय नरेंद्र धुरी; तृतीय सीताराम संभाजी परब.
मावळती वाडी : प्रथम यशवंत धुरी; द्वितीय राजेंद्र धुरी; तृतीय शरद वसंत धुरी.
भरड वाडी : प्रथम रमण भिकाजी धुरी; द्वितीय अमित पवार; तृतीय अशोक दत्ताराम धुरी.
बळीचे टेंब : प्रथम समीर सहदेव घोगळे; द्वितीय अप्पा अंकुश मालंडकर; तृतीय राजेश मधुकर घोगळे.
मठ वाडी : प्रथम विश्राम पालकर; द्वितीय बाळकृष्ण भाऊ बळी; तृतीय चेतन सारंग.
चिपकर वाडी : प्रथम अशोक खंदारे; द्वितीय नाना सावंत; तृतीय किसन चव्हाण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *