- माशांच्या कचऱ्यातून कोट्यवधींची कमाई? आंध्र प्रदेश पॅटर्न आता सिंधुदुर्गात
सिंधुदुर्ग : वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथे देशातील पहिल्या बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्राचे भव्य भूमिपूजन राज्याचे पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कोकण आणि सिंधुदुर्गच्या अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा देणारा ठरेल, तसेच स्थानिकांसाठी आर्थिक समृद्धीचा सुवर्णमार्ग उजळवेल, असा ठाम विश्वास मंत्री नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला.
- “रुग्णांना दवाखान्यात जाण्याची गरज नाही, डॉक्टरच येणार तुमच्या दारी!” पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ‘सिंधु जनसंवाद आरोग्य यात्रे’चा धडाक्यात शुभारंभ !
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती आणि दुर्गमता लक्षात घेता, ग्रामीण व दुर्गम भागातील शेवटच्या नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण जनतेला दिलासा देण्यासाठी आरोग्य यंत्रणेने स्वतः लोकांच्या घरापर्यंत पोहोचून वैद्यकीय सेवा देण्याला प्राधान्य द्यावे, असे ठाम प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.कणकवली तालुक्यातील
- सिंधुदुर्गातील २० गावांमध्ये होणार ५० जलसंधारणाची कामे; पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून प्राधान्याने मंजुरी
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी मिटवण्यासाठी आणि दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जल व मृदसंधारणाच्या कामांना त्यांनी प्राधान्याने मंजुरी दिली असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २० गावांमध्ये एकूण ५० कामे मंजूर करण्यात आली आहेत.“ग्रामीण भागातील पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी केवळ सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता, लोकसहभागातून
- घरगुती गणपती सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
सोनवडेकर श्री लिंग सार्वजनिक समाज, मुंबईतर्फे विविध वाड्यांतील विजेत्यांचा गौरव कुडाळ : सोनवडेकर श्री लिंग सार्वजनिक समाज, मुंबईतर्फे यंदाही घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गावातील विविध वाड्यांमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेला गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सामाजिक संदेश, पर्यावरणपूरक सजावट, कलात्मकता, भक्तिभाव, विज्ञान, निसर्ग, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मता आदी विषयांना सजावटीतून प्राधान्य देण्यात