Latest:

मैत्री आणि विश्वासाचे नाते…

राज्य

नवी मुंबई महानगरपालिकेच्या ‘अभिजात मराठी घोषवाक्य स्पर्धे’चा दिमाखदार निकाल; विजेत्यांना ग्रंथभेट देऊन गौरव!

नवी मुंबई: मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली नवी मुंबई महानगरपालिका मराठी घोषवाक्य स्पर्धा अत्यंत उत्साहात संपन्न झाली. ३ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत.. ३ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या मराठी भाषा संवर्धन सप्ताहाचे औचित्य साधून या विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना नुकतेच विष्णुदास भावे नाट्यगृहात मान्यवरांच्या शुभहस्ते ग्रंथस्वरूपात पारितोषिके प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री ना.श्री. गणेश नाईक, महापौर श्रीम. सुजाता पाटील, बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. नवी मुंबई महापौर चषक सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सव स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे औचित्य साधून या विजेत्यांचा गौरव करण्यात आला.

५ सामाजिक विषयांवर मंथन
स्पर्धकांना मराठी भाषा संवर्धन, स्वच्छता, पर्यावरण, प्लास्टिक प्रतिबंध आणि आरोग्य अशा ५ महत्त्वपूर्ण विषयांवर काव्यात्म संदेश सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. नागरिकांच्या विनंतीवरून स्पर्धेची मुदत १२ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली होती. स्पर्धेत ६० नागरिक आणि १५ नमुंमपा अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्वतंत्र गटात सहभाग घेतला. सुप्रसिद्ध साहित्यिक व कवी श्री. विनोद पितळे यांनी यामधून सर्वोत्कृष्ट घोषवाक्यांची निवड केली. प्रत्येक विजेत्याला १ हजार रुपये किमतीची दर्जेदार पुस्तके ग्रंथभेट म्हणून देण्यात आली.

विजेत्यांची नामावली
नागरिकांचा खुला गट: केतकी गाणेकर (मराठी भाषा संवर्धन), ऐश्वर्या कुंचमवार (स्वच्छता), आभा मिश्रा (पर्यावरण), प्रणित थळे (प्लास्टिक प्रतिबंध), कविता तेंडुलकर (आरोग्य).
नमुंमपा अधिकारी-कर्मचारी गट: अमृत पाटील (मराठी भाषा संवर्धन), राहुल जाधव (स्वच्छता), निता रांजणे (पर्यावरण), विजय नाईक (प्लास्टिक प्रतिबंध), साधना देशमुख (आरोग्य).
या संपूर्ण सप्ताहात सुप्रसिद्ध व्याख्याते श्री. संजय उपाध्ये आणि एआय तज्ज्ञ श्री. विवेक मेहेत्रे यांची व्याख्याने, तसेच नामवंत कवींच्या कविता सादरीकरण स्पर्धा अशा विविध उपक्रमांना नवी मुंबईकर साहित्यप्रेमींनी भरघोस प्रतिसाद दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *